Cholesterol Symptoms : थोडं चालल्यानंतर लगेचच थकवा यतो? दुर्लक्ष करु नका, असू शकतं उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण

High Cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे चालताना दिसणारी पाच महत्त्वाची लक्षणं जाणून घ्या. पायाला सूज, थंडपणा आणि छातीत दुखणं ही गंभीर संकेत आहेत. वेळीच काळजी घ्या.
walking signs of cholesterol
high cholesterol symptomsgoogle
Published On
Summary

उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे चालताना दिसतात

पाय सुजणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दुर्लक्ष करु नका

नियमित व्यायाम आणि आहाराने नियंत्रणात ठेवा

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमचे शरीर तुम्हाला दररोज काही संकेत देतं, जे ओळखणे खूप महत्वाचे आहे? विशेषतः जेव्हा तुम्ही चालायला जाता तेव्हा तुमच्या शरीरात काही लक्षणे दिसून येतात जी उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. पुढे आपण याची संपूर्ण लक्षणे जाणून घेणार आहोत.

पायाला सूज येणे

जर चालल्यानंतर तुमचे पाय, टाच किंवा गुडघे सुजलेले दिसत असतील, तर हे रक्ताभिसरणातील बिघाडाचं लक्षण आहे. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि द्रव शरीराच्या खालच्या भागात जमा होतो.

पायात किंवा बोटांत थंडपणा जाणवणे

हवामान सामान्य असतानाही पाय किंवा बोटं वारंवार थंड वाटत असतील, तर हे देखील संकेत असू शकतो. रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे खालच्या भागात पुरेसं रक्त पोहोचत नाही.

छातीत दुखणे किंवा अस्वस्थता

चालताना छातीत दाब, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर ते एनजाइनाचे लक्षण असू शकतं. हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचं संकेत असू शकतं.

श्वास घेताना त्रास होणे

पूर्वी सहज चालत असताना आता थोडं अंतर चालल्यानंतरच दम लागत असेल, तर हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. हृदयाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने हे लक्षण दिसू शकतं.

पायात गोळे येणे (Cramping)

पायांच्या स्नायूंमध्ये चालताना अचानक गोळे येत असतील, तर हे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) चे संकेत असू शकतात. याचं प्रमुख कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेज होणं.आजच्या धावपळीच्या जीवनात लोक अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की तुमचं शरीर दररोज काही संकेत देतं, जे वेळेत ओळखले नाहीत तर मोठ्या आजाराचं रूप घेऊ शकतात.

पायात गोळे येणे (Cramping)

पायांच्या स्नायूंमध्ये चालताना अचानक गोळे येत असतील, तर हे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) चे संकेत असू शकतात. याचं प्रमुख कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेज होणं.

ही सर्व लक्षणं दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार, व्यायाम आणि वेळोवेळी चाचण्या करून कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

Q

चालताना दिसणारी कोणती लक्षणं उच्च कोलेस्ट्रॉल दर्शवतात?

A

पायात सूज, थंडपणा, छातीत दुखणं, श्वास लागणं आणि पायात गोळे येणं ही प्रमुख लक्षणं आहेत.

Q

ही लक्षणं दिसल्यास काय करावं?

A

त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोलेस्ट्रॉल तपासणी करून आवश्यक उपचार सुरू करावेत.

Q

उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित कसं ठेवता येईल?

A

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ताण कमी ठेवून कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येतं.

Q

ही लक्षणं दुर्लक्षित केल्यास काय होऊ शकतं?

A

हृदयविकार, धमन्यांमध्ये ब्लॉकेज किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com