
जगभरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे अनेकांना हृदयरोग आणि इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, दरवर्षी तब्बल २.६ दशलक्ष मृत्यू वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे होतात. कोलेस्टेरॉल हे शरीरासाठी आवश्यक घटक असलं तरी त्याचं प्रमाण जास्त झालं तर त्याचे घातक परिणाम होतात.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हे शरीरातील पेशींमध्ये असणारं एक मेणासारखं फॅट आहे जे हार्मोन्स, व्हिटॅमिन D आणि पचनासाठी मदत करतं. मात्र रक्तात याचं प्रमाण जास्त झालं की हे फॅट इतर घटकांसोबत मिळून धमनींमध्ये साचतं आणि त्यामुळे रक्तप्रवाह अडतो. हाच जमा झालेला थर अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणून ओळखला जातो. हा आजार हृदयरोग, ब्लॉकेज आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतो.
डोळ्यांभोवती दिसणारी लक्षणं
उच्च कोलेस्टेरॉलची इशारा देणारी चिन्हं ही साधारणपणे वाढलेलं कोलेस्टेरॉल रक्त तपासणीशिवाय ओळखता येत नाही. मात्र काही वेळा शरीर बाह्य स्वरूपात इशारा देतं. डॉक्टरांच्या मते, डोळ्यांभोवती दिसणारी काही बदल ही लक्षणं दर्शवू शकतात. त्यामध्ये डोळ्यांखाली झोप पूर्ण होऊन सुद्धा काळे डाग दिसतात, डोळे दुखतात, खाज सुटते आणि डोळ्यांभोवतीची त्वचा पिवळी पडते.
Xanthelasma
डोळ्यांच्या आतील कोपऱ्याजवळ पिवळसर, थोडेसे उंचवटे दिसतात. हे म्हणजे त्वचेखाली साचलेले कोलेस्टेरॉलचे कण असतात.
कॉर्नियल आर्कस
डोळ्याच्या बाहुलीभोवती पांढरट वर्तुळ तयार होतं. हे विशेषतः वयानुसार दिसू शकतं, पण काही वेळा वाढलेल्या कोलेस्टेरॉलचं संकेतक असू शकतं. ब्रिटनच्या National Health Services (NHS) च्या मते, ५० वर्षांवरील व्यक्ती, पुरुष, रजोनिवृत्तीनंतरच्या महिला आणि दक्षिण आशियाई वंशातील लोकांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलचा धोका जास्त असतो. काही प्रकरणांमध्ये हे वंशपरंपरेने देखील आढळतं.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय
योग्य वेळी निदान झाल्यास FH नियंत्रित करता येतो. NHS मार्गदर्शक सूचनांनुसार, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं, तसेच सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे.
वैद्यकीय तज्ञ सांगतात की, वाढलेलं कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्या अडवून हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतं. त्यामुळे जर तुम्हाला डोळ्यांभोवती पिवळसर थर किंवा पांढरं वर्तुळ दिसत असेल, तर ते दुर्लक्ष करू नका. ताबडतोब रक्त तपासणी करून वैद्यकीय सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.