Sakshi Sunil Jadhav
दिवाळी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. घरामध्ये दिवाळीच्या स्वच्छतेनंतर घर चकाचक दिसतं, पण काही दिवसांनी पुन्हा जाळ्या दिसायला लागतात.
पुढे आपण यावर काही भन्नाट आणि घरगुती टिप्स सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे घर दिवाळीच्या ५ ते ६ दिवस चकाकेल आणि जाळ्यांची चिंता ही मिटेल.
घरात कोळी किंवा जाळ्यां लागल्या असतील, थोडं पुदिन्याचं तेल पाण्यात मिक्स करुन स्प्रे करा आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडा.
जाळ्या कोपऱ्यांमध्ये तयार होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा लांब दांड्याच्या झाडूने छत, पंखे, खिडक्या नीट झाडा.
फर्निचरच्या मागे आणि खाली धूळ साचल्याने कोळी होतात. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा ओलसर कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर सुगंधी तेलाचा स्प्रे करा.
कोळी अंधार, दमट आणि बंद जागांवर येतात. त्यामुळे दिवसातून काही वेळा खिडक्या उघड्या ठेवा. सूर्यप्रकाश आणि हवा यामुळे कोळी, कीटक दूर राहतात.
१ कप पाण्यात १० थेंब लिंबू किंवा निलगिरीचं तेल मिसळून स्प्रे तयार करा. आठवड्यातून दोनदा हा स्प्रे वापरा.
बाथरूम, सिंकखालील कपाटं किंवा स्टोअररूममध्ये ओलावा राहिल्यास कोळी येतात. तिथे सुकं ठेवण्यासाठी बेकिंग सोडा किंवा चारकोल बॉल ठेवा. हे ओलावा शोषून घेतात.