Sakshi Sunil Jadhav
आजकाल केस पांढरे होण्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यासाठी हेअर कलर लावलात आणि काही दिवसांतच रंग फिकट होत असल्याची तक्रार अनेकांना असते.
केस काळेभोर आणि सुंदर दिसण्यासाठी काही घरगुती आणि प्रोफेशनल ट्रिक्स आहेत ज्यामुळे कलर दीर्घकाळ टिकतो.
रंगवलेले केस गरम पाण्याने धुणे टाळा. थंड पाण्याने रंग टिकून राहतो.
कलर केलेल्या केसांचे नॉर्मल शॅम्पूमुळे नुकसान होऊ शकतं. कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फेटचा वापर केला जातो.
तुम्ही जर केसांना कलर केला असेल तर, Sulfate-free किंवा Color-Protect अशा शॅम्पूचा वापर करु शकता. त्याने केस दिर्घकाळ काळेभोर राहतील.
कलर केलेल्या केसांमधून नैसर्गिक तेल आणि सॉफ्टनेसपण कमी होतो. त्यासाठी आठवड्यातून किमान १ वेळेस डीर कंडीशनिंग करा.
डीप कंडीशनिंगमुळे केसांना पोषण मिळतं आणि केस सॉफ्ट होतात. त्यात शिया बटर, केरिटीन किंवा कोकोनट ऑईलचा समावेश करा.
कलर केलेल्या केसांना उन्हापासून वाचवण्यासाठी तुम्ही सार्फचा वापर करु शकता.