Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Living away from home: लहान वयात घरापासून दूर राहणाऱ्या तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. असा एका अभ्यासातून दावा समोर आला आहे. चुकीची जीवनशैली, ताण आणि अयोग्य आहार यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Young adults lifestyle
Young adults lifestyleSAAM TV
Published On

आजकालच्या मुलांना शिक्षण किंवा नोकरीमुळे खूप लहान वयातच घरापासून दूर राहावं लागतं. काही जण शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जातात तर काही जण कामासाठी पालकांपासून दूर परदेशात जातात. मात्र तुम्हाला माहितीये का, घरापासून दूर राहणं आरोग्याच्या धोकादायक ठरू शकतं?

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात ही धक्कादायक घटना अलीकडील अभ्यासात, फिनलँड आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, लहान वयात घरापासून दूर राहणाऱ्या मुलांना आणि किशोरवयीन मुलांना हार्ट अटॅक येण्याचा आणि हृदयाच्या इतर आजारांचा धोका वाढतो.

Young adults lifestyle
Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

अभ्यासात काय म्हटलंय?

फिनलंड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेला आणि 'युरोपियन जर्नल ऑफ एंडोक्राइनोलॉजी'मध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यासात नमूद केलंय की, ज्यावेळी एखादी तरुण व्यक्ती किंवा किशोरवयीन व्यक्ती घर सोडते तेव्हा त्यांच्या जीवनशैलीत मोठे बदल होतात. पौष्टिक जेवणाची कमतरता आणि जंक फूडचं सेवन, तेलकट पदार्थ आणि पॅकेज अतिप्रमाणात खाल्ले जातात.

इतकंच नाही तर अनेकजण दारू आणि सिगारेटच्याही आहारी जातात. या बदलामुळे शरीरात फॅट्स जमा होतात. याशिवाय एकटं राहण्याचा ताण, झोपेचा अभाव आणि व्यायामाचा अभाव यांचा हृदयाच्या धमन्यांवर नकारात्मक परिणाम होतो. संशोधकांच्या मते, अभ्यासामध्ये १८ ते १९ वयोगटातील तरुणांमध्येही हृदयाच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं दिसून आली. ज्यामुळे भविष्यात त्यांना हार्ट अटॅकचा धोका संभवतो.

Young adults lifestyle
Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

कोणावर करण्यात आला अभ्यास?

शास्त्रज्ञांनी ९ ते २४ वयोगटातील १,८०३ मुलांच्या आरोग्याची माहिती घेतली. त्यांनी पोटातील आणि शरीरातील चरबीचं प्रमाण तसंच स्नायूंचं प्रमाण तपासण्यासाठी ड्युअल-एनर्जी एक्स-रे ॲबसॉर्प्टिओमेट्री (DXA) स्कॅनचा वापर केला. ९, ११, १५, १७ आणि २४ वयोगटातील मुलांवर स्कॅन करण्यात आलं.

यावेळी हृदय कसं काम करतंय, इन्सुलिन, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी १७ आणि २४ वयोगटातील मुलांवर इकोकार्डिओग्राफी स्कॅन देखील करण्यात आलं. शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, वयाच्या १७ व्या वर्षापासून शरीरात वाढणारी अतिरिक्त चरबी हृदयासाठी घातक ठरते. यामुळे रक्त पंप करण्याच्या सामान्य प्रक्रियेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Young adults lifestyle
Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

कशा टाळू शकता या गोष्टी?

डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचा सल्ला आहे की, जर तुम्ही काम किंवा अभ्यासासाठी परदेशात राहत असाल तर तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. बाहेरचं अन्न खाण्याऐवजी, स्वतःच्या जेवण बनवण्याची सवय लावा. यावेळी आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com