

बिझी शेड्यूल आणि कामाचा ताण यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा याचे विपरीत परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येतात. यावेळी किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. अनेकदा हे आजार वाढून जीवघेणे देखील ठरू शकतात.
डॉक्टरांच्या मते, किडनी फेल्युअर म्हणजेच किडनी निकामी होणं. या समस्येमध्ये ज्यामध्ये किडनी रक्तातील टॉक्सिन फिल्टर करण्याची क्षमता गमावते. किडनी फेल्युअर ही समस्या अचानक किंवा हळूहळू अशा दोन्ही प्रकारे उद्भवू शकते. दोन्ही परिस्थितींमध्ये शरीरात टॉक्सिन पदार्थ आणि अतिरिक्त द्रव साठू लागतो, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किडनी निकामी होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातात. त्याची लक्षणं वेळीच ओळखली तर त्यावर वेळीच उपचार कऱणं शक्य होतं. याची लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया. तीव्र स्वरूपातील पाठदुखी हे एकच किडनी फेल होण्याचं लक्षण नसतं.
किडनी व्यवस्थित काम करत नसल्यास शरीरातील टॉक्सिन पदार्थ बाहेर पडत नाहीत आणि रक्तात साचतात. यामुळे सतत थकवा जाणवतो. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीर थकल्यासारखे वाटतं. यावेळी रूग्णाला झोपेत श्वास घेण्याचा त्रासही जास्त प्रमाणात दिसतो.
लघवी करताना जर जास्त प्रमाणात फेस दिसत असेल आणि तो लगेच नाहीसा होत नसेल तर ते शरीरातून प्रोटीन जास्त प्रमाणात बाहेर जात असल्याचे संकेत असू शकतात. डॉक्टर सांगतात की, हा फेस अंडं फेटताना तयार होणाऱ्या फेसासारखा दिसतो. हे किडनीच्या फिल्टरला नुकसान झाल्याचं लक्षण असू शकतं.
किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात साचलेलं अतिरिक्त द्रव फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतं. यामुळे श्वास घेणं कठीण होतं. या परिस्थितीला पल्मनरी एडिमा असं म्हणतात. किडनी फेल्युअरमुळे अॅनिमिया होतो ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो. परिणामी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो.
किडनी शरीरातील कचरा बाहेर टाकण्यासोबतच खनिजांचं संतुलन राखतं. पण किडनी योग्य पद्धतीने काम करत नसल्यास हे संतुलन बिघडतं आणि त्वचा कोरडी होते. परिणामी व्यक्तींच्या त्वचेला खाज येऊ लागते.
भूक न लागणं हे किडनी फेल्युअरचं एक सामान्य लक्षणं आहे. डॉक्टरांच्या मते, शरीरात टॉक्सिन पदार्थ साचल्यामुळे भूक कमी होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.