Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Early signs of blood cancer: ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं साधी वाटू शकतात, पण वेळेत ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नयेत ते जाणून घेऊयात.
Blood cancer symptoms
Blood cancer symptomsSAAM TV
Published On

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजार आपल्या मागे लागतात. चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य आहार यामुळे कॅन्सरसारख्या आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापैकीच एक गंभीर म्हणजे ब्लड कॅन्सर. सुरुवातीला त्याची लक्षणं साधी वाटू शकतात. मात्र जर वेळेत लक्ष दिलं नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

ब्लड कॅन्सर हा बोन मॅरो सुरू होतो आणि रक्तातील पेशींवर परिणाम करतो. ब्लड कॅन्सरचे प्रमुख प्रकार म्हणजे ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा आहेत. त्यामुळे शरीरात रक्तनिर्मितीची प्रक्रिया बिघडू लागते. शिवाय याची अनेक लक्षणं दिसू लागतात.

या आजाराचे आणि प्रकार असल्यामुळे त्याची लक्षणंही वेगवेगळी असू शकतात. मात्र याचं निदान वेळेत झालं तर उपचार अधिक लवकर होऊ शकतात. म्हणूनच काही सुरुवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. याची सुरुवातीची लक्षणं काय आहे ते पाहूयात.

मानेत गाठ लागणं

मान किंवा बगल परिसरात जर गाठीसारखं, मऊ आणि वेदनारहित सूज दिसली तर सावध व्हा. ही सूज जर काही आठवडे कायम राहिली तर ती लिम्फोमाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Blood cancer symptoms
Pediatric Kidney Cancer: 2 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये वाढतोय धोका, लहानग्यांमध्ये दिसणाऱ्या किडनी कॅन्सरची लक्षणं वेळेत ओळखा

रात्री घाम येणं

जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय ताप किंवा रात्री घाम असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कारण ताप आणि रात्री घाम येणं ही लक्षणंही दुर्लक्षित करता कामा नयेत. ही लक्षणं हॉकिंस आणि नॉन-हॉकिंस लिम्फोमा तसंच ल्युकेमियामध्येही दिसून येतात.

अचानक वजन कमी होणं

अचानक वजन कमी होणं हीसुद्धा एक गंभीर बाब मानली जाते. काही आठवड्यांत किंवा महिन्यांत वजन घटत असेल तर ते शरीरातील मेटाबॉलिझममध्ये झालेल्या बदलामुळे असू शकतं. हा बदल शरीरात कॅन्सरमुळे होऊ शकतं.

रक्ताच्या निर्मितीवर परिणाम

रक्ताचा कॅन्सर शरीरातील रक्तनिर्मितीवर परिणाम करतो. त्यामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता असते. यामुळे सतत थकवा येणं, चेहरा फिकट दिसणं आणि थोडं चालून देखील धाप लागणं अशी लक्षणं दिसतात.

Blood cancer symptoms
Cervicitis Warning: या कारणांनी येते गर्भाशयाच्या मुखाला सूज; लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

हिरड्यांमधून रक्तस्राव होणं

जर तुमच्या हिरड्यांमधून सतत रक्तस्राव होत असेल तर जखमांमधून जास्त रक्तस्राव होणं, सहज जखमा होणं किंवा हिरड्यांमधून रक्त येणं ही लक्षणंही गंभीर संकेत देऊ शकतात.

यकृताचा आकार वाढणं

काही रक्ताच्या कॅन्सरमध्ये यकृताचा आकार मोठा होऊ शकतो. ज्यामुळे अपचन, पोटदुखी किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो. अशी लक्षणं दिसल्यास उशीर न करता लगेच डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

Blood cancer symptoms
Endometriosis symptoms: सततच्या पोटातील वेदनेकडे दुर्लक्ष करू नका? ओव्हेरियन सिस्ट फुटण्याचा धोका, वेळीच ओळखा लक्षणं

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com