Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Healthy Eating: रात्री उशिरा आणि जड जेवण केल्याने पचन बिघडते, झोपेवर परिणाम होतो आणि वजन वाढते. तज्ज्ञांच्या मते डायबिटीज, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
Healthy Eating
Late Night Eatinggoogle
Published On

अनेक घरांमध्ये रात्री कुटुंबासोबत बसून जेवण करण्याची सवय असते. त्यामुळे बऱ्याचदा रात्री उशिरा आणि भरपूर जेवण आपण जेवतो. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नकळत रात्री जड आणि तेलकट अन्न खाल्ल्यामुळे पचनसंस्था आणि झोप या दोन्हींवर परिणाम होतो.

तज्ज्ञांच्या मते, रात्री शरीराचा मेटाबॉलिजम मंदावलेला असतो. अशावेळी जास्त कॅलरी असलेलं अन्न खाल्ल्यास शरीर ती ऊर्जा वापरू शकत नाही आणि ती फॅटच्या रूपात साठत असतं. त्यामुळे वजन वाढण्याचा धोकाही वाढतो. काहींचं वजन वाढण्यामागचं कारण रात्रीचं जड जेवण आहे, हे लक्षातही येत नाही. रात्री जास्त आणि तळलेलं अन्न खाल्ल्याने अॅसिडिटी, पोटदुखी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात. या त्रासांमुळे झोपही नीट लागत नाही. सतत झोप मोडल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि सुस्ती जाणवते.

Healthy Eating
Cheapest Jio Recharge : Jioचा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, ओटीटी Free अन् 61GB डेटा

तज्ज्ञांच्या मते, उशिरा आणि जड पदार्थ आहारात खाल्ल्याने इन्सुलिन सेंसिटिव्हिटीवर परिणाम होतो. त्यामुळे Type 2 Diabetes चा धोका वाढू शकतो. इतकच नाहीतर मेटाबॉलिक सिंड्रोम आणि Heart Disease यांसारख्या आजारांचा धोका सुद्धा वाढतो.

ज्यांना आधीपासूनच डायबिटीज किंवा हृदयविकार आहेत, त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Eating
Kiwi Icecream: मुलं फळं खायला नाक मुरडतात? १ ट्रिकने बनवा आंबट-गोड किवी आईस्क्रीम, वाचा रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com