Sakshi Sunil Jadhav
वाढत्या उन्हामध्ये अनेकांना थंड खाण्याची इच्छा होते. तुम्ही घरात असलेल्या फळांपासूनच थंडगार आईस्क्रीम बनवू शकता.
तुम्ही घरात किवीची आंबट-गोड आईस्क्रीम घरच्या घरी कमी साहित्यात बनवून मुलांना देऊ शकता.
४पिकलेलं किवीचं फळं, अर्धा कप साखर, ३ कप थंड हेवी क्रीम, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स इ.
सर्वप्रथम, किवी फळाची सालं काढून ते स्वच्छ धुवा. मग त्याचे लहान तुकडे करुन घ्या. पुढे ते मिक्सरमध्ये घालून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
आता सजावटीसाठी थोडी कापलेली किवी बाजूला ठेवा आणि ही पेस्ट रेफ्रिजरेटरमध्ये थंड होऊ द्या.
एका मोठ्या भांड्यात थंड हेवी क्रीम घ्या. त्यात साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून हँड ब्लेंडरने हलक्या हाताने फेटा.
आता, थंड झालेली किवी पेस्ट क्रीममध्ये घालून कट अँड फोल्ड पद्धतीने व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
सर्व साहित्य मिक्स होईपर्यंत पुन्हा फेटून घ्या. त्यातली साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे.
शेवटी हे मिश्रण एका ट्रे किंवा डब्यात ओता. उरलेल्या किवी त्याच्यावर टाकून सजवा. ७ ते ८ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग सर्व्ह करा.