Sakshi Sunil Jadhav
साप हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक घातक प्राणी आहे. जंगल कमी होत असल्याकारणामुळे ही जनावरं तुमच्या परिसरात लपून बसलेली असू शकतात.
घराजवळ जंगल, बाग, तलाव किंवा दगडी परिसरात साप दिसतात. पण काही विशिष्ट वास सापांना अजिबात सहन होत नाहीत आणि त्या वासांपासून ते दूर पळतात. तुम्ही हे वास घराजवळ ठेवले तर सापांची भीती कायमची निघून जाईल.
पुदीना आणि तुळशीचा सुगंध सापांना आवडत नाही. घराच्या आजूबाजूला ही झाडं लावल्यावर साप लांब पळून जातात.
लसूण-कांद्याचा वास सापांना घातक वाटतो. त्याचा रस किंवा तुकडे घराच्या दाराजवळ ठेवा.
सापांना धूर अजिबात सहन होत नाही. कोरडी पानं जाळून किंवा अगरबत्ती लावून तुमच्या आजूबाजूच्या परिसरात धूर केल्याने साप लांब जातात.
लिंबू, व्हिनेगर आणि दालचिनीचं तेल या तिन्ही गोष्टींचं मिश्रण तयार करून घराभोवती फवारणी करा.
अमोनियाचा तीव्र वास सापांना लांब ठेवतो. तर लहान भांड्यात अमोनिया ठेवून कोपऱ्यात ठेवा.
कचरा, गवत किंवा ओलसर जागा सापांना आकर्षित करतात. त्यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.
भिंतींमधल्या किंवा दरवाजाजवळील फटीतून साप येऊ शकतात. त्या वेळेवर बंद करा.
उंदीर आणि इतर छोटे प्राणी हे सापांचे खाद्य असतात. त्यामुळे हे प्राणी घरातून बाहेर काढून टाका.