Sakshi Sunil Jadhav
सगळ्याच महिलांना वाटतं की, आपलं स्वयंपाक घर स्वच्छ असावं. पण काही किचनमधले डाग हे काही केल्या जात नाहीत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा गॅसवर असलेल्या तेलकट डागांवर, जळलेल्या अन्नावर कार्बन साचत जातो. सुरुवातीला हे डाग दिसत नाही नंतर त्यांचं पिवळ्या रंगांच्या डागात रुपांतर होतं.
पुढील सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही स्वच्छ बर्नर तुमच्या स्वयंपाक घरात दिसतील. या सोप्या टिप्स तुमची मेहनत खूप कमी करतील.
सर्वप्रथम स्वच्छता सुरू करण्याआधी गॅस पूर्णपणे बंद करून बर्नर थंड होऊ द्या.
१० मिनिटांनी थंड झाल्यानंतर बर्नर हळूच काढून वेगळा ठेवा. मग त्यावर पेस्ट लावा.
बेकिंग सोड्याच्या पेस्टसाठी 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा आणि थोडं पाणी मिक्स करुन पेस्ट बनवा. डाग असलेल्या भागावर पेस्ट लावून घ्या.
पेस्टमुळे घाण मऊ होऊन काढणं सोपं होतं. मग घासायला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
जुना टूथब्रश किंवा मऊ ब्रश वापरून बर्नर स्वच्छ करा. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिक्स करुनही चांगल्या प्रकारे बर्नर स्वच्छ करता येतं.