

सनातन धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व देण्यात आलंय. वास्तुनुसार घरात काही मूर्ती ठेवणं शुभ मानण्यात येतं. असं मानलं जातं की, घराच्या योग्य दिशेने शुभ मूर्ती ठेवल्याने सुख, शांती आणि समृद्धी वाढते. त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होतात. जर तुम्हालाही तुमच्या घरात शांती आणि आनंद हवा असेल वास्तूशास्त्राचे काही उपाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल
धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि रेंगाळलेली कामं पूर्ण होतात. म्हणूनच घरात गणपतीची मूर्ती ठेवणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. वास्तुनुसार, गणपती बाप्पाची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते आणि सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळतं.
घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवणं वास्तू शास्त्रानुसार फायदेशीर आहे. यामुळे संपत्ती वाढते असा समज आहे. ही मूर्ती प्रवेशद्वारासमोर ठेवावी जेणेकरून घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला लाफिंग बुद्धाचं दर्शन होऊ शकेल.
घरात भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती ठेवणं शुभ मानण्यात येतं. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि पती-पत्नीमधील नातं मजबूत होतं, असं म्हणतात. ही मूर्ती नैऋत्य दिशेला ठेवावी.
वास्तुनुसार, घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आरोग्य वाढतं. शिवाय ही मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी ईशान्य दिशा शुभ मानली जाते. यामुळे सर्व इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत होते.
वास्तुनुसार, घरात हत्तींच्या जोडीची मूर्ती ठेवल्याने नशीब, पैसा आणि बुद्धी वाढते. ही मूर्ती घरातमध्ये असणं शुभ असणं. यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.