ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रामध्ये व्यवहार आणि देवाणघेवाणीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. वास्तूनुसार, काही वैयक्तिक वस्तू अशा आहेत ज्या इतरांसोबत कधीही शेअर करू नयेत.
वास्तुशास्त्रानुसार, या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्याने तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तर जाणून घ्या त्या गोष्टींबद्दल.
वास्तुशास्त्रानुसार, साखरपुड्याची अंगठी कधीही इतरांना देऊ नये. कारण ती एक मजबूत नाते आणि प्रेमाचे प्रतीक मानली जाते.
असे केल्याने जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव आणि समस्या निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते. याचा आर्थिक स्थैर्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
साडी किंवा लेहेंग्यासारखे लग्नाचे कपडे देखील इतरांसोबत शेअर करू नयेत.असे मानले जाते की लग्नाचे कपडे इतरांसोबत शेअर केल्याने तुमची वैयक्तिक ऊर्जा आणि भावना कमजोर होऊ शकतात.
वास्तुशास्त्रामध्ये झाडूला विशेष महत्त्व आहे. तो संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे, तुमचा घरातील झाडू कधीही दुसऱ्यांना देऊ नका.
तुम्ही तुमचे मनगटी घड्याळ इतरांना देऊ नये. असे केल्याने तुमच्या नशिबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचा तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनावरही परिणाम होऊ शकतो.
आपल्या घराचे कुलूप किंवा किल्ली इतरांना देणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक नुकसान, चोरी किंवा संपत्तीची वाढ थांबणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.