ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देवघर हे घरातील पवित्र व सकारात्मक ऊर्जेचे स्थान असते. स्वच्छ देवघरामुळे एकाग्रता वाढते, मन शांत राहते आणि घरात चांगले वातावरण राहते.
स्वच्छता सुरु करण्यापूर्वी हात-पाय धुणे गरजेचे असते. तसेच देवघरातील सर्व देव आणि वस्तू हळूच बाहेर काढून कापडावर ठेवा.
मऊ, कोरड्या किंवा किंचित ओलसर कापडाने मूर्ती व देवांचे फोटो हलक्या हाताने पुसून घ्या. जास्त पाणी किंवा केमिकल वापरू नका.
ओल्या कापडाने धूळ पुसून नंतर कोरड्या कापडाने पुन्हा पुसून घ्या. तसेच लाकडी देवघर स्वच्छण्यासाठी हलकेसे क्लिनर किंवा पाणी वापरा.
दिवा, अगरबत्ती स्टँड, घंटा यावर आलेले डाग काढून टाका. तसेच पितळ आणि तांब्याच्या वस्तूंना लिंबू व मीठ किंवा पितांबरी लावून स्वच्छ करा.
जुनी फुले, निर्माल्य कचऱ्यात न टाकता झाडाखाली किंवा कुंडीत टाका नाहितर नदीमध्ये विसर्जीत करा.
धूप, अगरबत्ती, कापूर किंवा नैसर्गिक सुगंध वापरा. जास्त तीव्र व केमिकलने भरलेला फ्रेशनर टाळावा.
मूर्ती व फोटो नीट, समोरासमोर व स्वच्छ कापडावर ठेवा. दिवा, अगरबत्ती योग्य जागी ठेऊन देवघर नीट सजवा. फुले वापरुन देवघर आकर्षित करा.
देवघराची दररोज हलकी स्वच्छता करावी आणि आठवड्यातून एकदातरी देवघराला पूर्णपणे साफ करा. यामुळे देवघर नेहमी पवित्र व प्रसन्न राहते.