ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच तासन्तास लागतील असे नाही. दररोज फक्त 15 मिनिटे दिलीत तर घर कायम नीटनेटके आणि फ्रेश राहू शकते. जाणून घ्या टिप्स
मोबाइलमध्ये 15 मिनिटांचा टाइमर लावून घप पटापट आवरत घ्या. वेळ मर्यादित असल्यामुळे काम वेगात आणि लक्ष केंद्रित करून होते.
सोफा,टेबल, बेडवर पडलेल्या वस्तू जसे कि चार्जर, कप, पुस्तकं त्यांच्या जागेवर ठेवा. यामुळे पसारा होऊन घर लगेच आवरलेलं दिसतं.
बेड आणि सोफा वरील बेडशीट आणि कव्हर नीट पसरवावे आणि उशा सरळ करून ठेवाव्या. फक्त 2 मिनिटांत बेडरूमचा लुक बदलला जातो.
हॉल, किचन आणि संपूर्ण घरातलाा कचरा काढून घ्या आणि हलक्या हाताने पोछा मारुन घ्या. संपूर्ण घर रोज नीटनेटके दिसेल.
गॅस आणि ओटा पुसून घ्या, वापरलेली भांडी सिंकमध्ये ठेवा आणि नंतर घासून घ्या. किचन स्वच्छ दिसले की अर्धं घर आवरलेलं वाटते.
ओला-सुका कचरा बाहेर टाकून द्या. जुने पुराने कागद पत्र, न्यूज पेपर घरात जास्त काळ ठेवू नये. घरात कचरा वाटून घर अस्वच्छ दिसते.
ही 15 मिनिटांची सवय रोज लावा. आठवड्याला मोठी साफसफाई करायची गरजच पडणार नाही.