ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गणपतीपुळे हे केवळ गणपती मंदिरासाठीच प्रसिद्ध नाही, तर आजूबाजूच्या परिसरात अनेक शांत, सुंदर आणि कमी गर्दीची ठिकाणे लपलेली आहेत, जी फारच कमी लोकांना माहीत आहेत. ती अशी ठिकाणे आहेत जीथे तुम्ही फिरण्याकरिता जावू शकता.
गणपतीपुळ्यापासून 20 किमी अंतरावर असलेला जयगड किल्ला इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. येथून अरबी समुद्र व जयगड खाडीचे अप्रतिम दृश्य दिसते.
हा एक शांत आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे.हे ठिकाण सनसेट पाहण्यासाठी हे एक हिडन जेम मानले जाते. तसेच येथे खाद्य संस्कृतीचा अस्वाद घेता येतो.
कवी केशवसुतांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे मालगुंड हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. स्वच्छ, शांत आणि रिलॅक्सिंग बीच येथे अनुभवता येतो.
गणपतीपुळ्यापासून थोड्याच अंतरावर असलेला हा किनारा फारच स्वच्छ व शांत आहे. हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी वेढला गेला असून सकाळी फिरण्यासाठी व मेडिटेशनसाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.
रत्नागिरी शहाराच्या जवळ असणारा विस्तीर्ण आणि कमी गर्दीचा हा समुद्रकिनारा आहे. लांब चालण्यासाठी आणि फोटोसाठी अतिशय सुंदर स्पॉट असून हा समुद्रकिनारा प्रसिद्ध मामला जातो.
गणपतीपुळ्याजवळील हा उंच टेकडीवरील पॉईंट सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. येथून समुद्र, मंदिर आणि संपूर्ण परिसर दिसतो.
गणपतीपुळे परिसरात स्थानिक कोकणी जेवण, थाळी, सोलकढी, आंबोळी यांचा आस्वाद घ्यायला मिळतो.होमस्टे मध्ये राहिल्यास गावजीवनाचा अनुभव येतो आणि नवनवीन गोष्टींचा अनुभव घेता येतो.
येथे तुम्ही ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान भेट देऊ शकता. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी हिडेन जागा एक्सप्लोर करु शकता.