ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दापोली हे कोकणातील शांत, सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. दापोलीला “मिनी महाबळेश्वर” असेही म्हटले जाते. समुद्रकिनारे आणि थंड हवामान हे दापोलीचे वैशिष्ट्य आहे.
दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले सुंदर असे गाव आहे. मुंबई व पुण्यापासून हे ठिकाण वीकेंड ट्रिपसाठी खूप प्रसिध्द आहे. दापोलीत २ दिवसांची ट्रिप आरामात करता येते.
मुंबईहून दापोली सुमारे 230 किमी लांब आहे. कारने किंवा बस गेल्यास 7 ते ८ तास लागतात. पुण्याहून गेल्यास सुमारे 190 किमी इतके अंतर आहे. ट्रेनने गेल्यास तुम्ही खेडला उतरु शकता.
लाडघर बीच, मुरुड बीच आणि कोलथरे बीच हे दापोलीतील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. स्वच्छ आणि शांत लांबच लांब वाळूचा किनारा असलेले हे समुद्रकिनारे किनिसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहेत.
सुवर्णदुर्ग किल्ला, कर्दे मुरुड, दापोली कृषी विद्यापीठ परिसर आणि पन्हाळेकाजी लेणी ही ठिकाण पाहण्यासारखी आहेत.
कोकणी मासे, सोलकढी, घावन, नारळी उसळ, आणि ताजी सीफूड थाळी प्रसिध्द आहे. कोकणातील अनेक पदार्थ फेमस आहेत.
राहण्याकरिता बजेट लॉज, रिसॉर्ट्स, होमस्टे आणि व्हिला समुद्रकिनाऱ्याजवळ उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ राहण्याचा अनुभव खास असतो.
ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान दापोलीला जाणे बेस्ट मानले जाते. या काळात जावून छान गुलाबी थंडीचा आनंद घेता येतो.फॅमिली, कपल आणि फ्रेंड्स ट्रिपसाठी हे उत्तम ठिकाण आहे.