ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. कमी गर्दी, स्वच्छ बीच आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हे ठिकाण शांत सुट्टीसाठी खूप लोकप्रिय आहे.
गुहागर बीच स्वच्छ, रुंद आणि सुरक्षित आहे. इथे व्यावसायिक गोंगाट कमी असून नैसर्गिक सौंदर्य आजही जपलेलं आहे. तसेच येथील सनसेटचा नजारा खास आकर्षण ठरतो.
लांब पसरलेला वाळूचा समुद्रकिनारा, निळसर समुद्र आणि नारळाची झाडं हे गुहागर बीचचे वैशिष्ट्य आहे. कुटुंब, कपल्स आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हे ठिकाण योग्य आहे.
व्याघ्रेश्वर मंदिर, वेलणेश्वर बीच, आरे–वारे बीच आणि जयगड किल्ला ही ठिकाणे गुहागरजवळ आहेत.
मुंबई किंवा पुण्याहून गुहागरला जाण्यासाठी स्व:ताचे वाहन सर्वात सोयीचे आहे. मुंबई, चिपळूण, गुहागर किंवा मुंबई, म्हापसा, गुहागर असे मार्ग वापरता येतात.
चिपळूण हे गुहागरचे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. चिपळूणहून गुहागरला एसटी बस, रिक्षा किंवा टॅक्सीने सहज जाता येते.
गुहागरमध्ये होमस्टे, बजेट रिसॉर्ट्स आणि लॉज उपलब्ध आहेत. स्थानिक कोकणी जेवणासह राहण्याची सोय अनेक ठिकाणी मिळते. आधी बुकिंग केल्यास चांगले पर्याय मिळतात.
गुहागरमध्ये कोकणी जेवण, मासे थाळी, सोलकढी, भाकरी आणि नारळावर आधारित पदार्थ प्रसिद्ध आहेत.
ऑक्टोबर ते मार्च हा गुहागरला भेट देण्यासाठी बेस्ट काळ आहे. येथे उन्हाळा आणि पावसाळ्यात गर्दी कमी असते.