Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Child height and weight: मुलाची वाढ तपासताना फक्त उंची आणि वजन पाहणे पुरेसे नाही. वाढीचा वेग, ग्रोथ चार्ट, पोषण, झोप आणि शारीरिक हालचालींकडेही लक्ष द्या. वाढ मंदावल्यास किंवा वजनात असामान्य बदल झाल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Child growth
Child growthsaam tv
Published On

मुलाची उंची आणि वजन त्याच्या वयाच्या तुलनेत योग्य आहे का, याची काळजी अनेक पालकांना असते. मात्र, मुलाची वाढ तपासताना फक्त उंची आणि वजन पाहणं पुरेसं नाही. ठरावीक काळात मुलाची वाढ किती वेगाने होत आहे आणि त्यात सातत्य आहे का, हेही पाहणं महत्त्वाचे आहे. मुलाचे आरोग्य आणि त्याला मिळणारे पोषण याची माहिती देणारा वाढीचा वेग हा एक महत्त्वाचा संकेत आहे, असं मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील सल्लागार, बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी सांगितलंय.

प्रत्येक मुलाची वाढ वेगळी

प्रत्येक मुलाची वाढ एकसारखी होत नाही. त्यामुळे मुलाची इतर मुलांशी तुलना करण्यापेक्षा डॉक्टर ग्रोथ चार्टच्या मदतीने त्याची उंची, वजन आणि वाढीचा वेग वेळोवेळी तपासतात. मुलाची वाढ त्याच्या स्वतःच्या वाढीच्या आलेखानुसार सातत्याने होत असेल, तर साधारणपणे त्याची वाढ योग्य प्रकारे सुरू असल्याचं मानलं जातं.

Child growth
High blood pressure: मधुमेह आणि हायपरटेन्शन बनतंय साइलेंट किलर, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

या कारणांमुळे वाढीवर परिणाम

मुलाला भूक न लागणं, पुरेशी झोप न मिळणं, वारंवार संसर्ग होणं, दीर्घकाळ आजार असणं किंवा शरीराला पुरेसे पोषण न मिळणं यामुळे त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. काही मुलांची उंची अपेक्षेइतकी वाढत नाही, तर काही मुलांचं वजन वयानुसार पुरेसे वाढत नाही. दुसरीकडे कमी वेळेत वजन खूप वेगाने वाढणं हेदेखील आरोग्याशी संबंधित काही समस्येचं लक्षण असू शकतं.

निरोगी वाढीसाठी काय आवश्यक?

मुलाची वाढ चांगली होण्यासाठी त्याच्या आहारात प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजं योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. संतुलित आहारासोबतच नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोपही मुलाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. तसंच नियमित आरोग्य तपासणी केल्याने मुलाच्या वाढीत होत असलेले बदल वेळेत लक्षात येऊ शकतात.

Child growth
Diabetes: टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीज यांच्यात काय आहे फरक? कोणता प्रकार जास्त धोकादायक?

पालकांनी काय लक्षात ठेवावं?

पालकांनी आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना न करता त्याच्या स्वतःच्या वाढीचा पॅटर्न कसा आहे, याकडे लक्ष द्यावं. मुलाची उंची किंवा वजन आधीच्या तुलनेत वाढत नसल्याचं दिसल्यास, वाढीचा वेग अचानक कमी झाल्यास किंवा वजनात असामान्य बदल झाल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेवर तपासणी केल्यास वाढ नीट न होण्यामागचं कारण शोधता येतं आणि त्यानुसार योग्य उपचार व मार्गदर्शन करता येतं.

Child growth
Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com