Yoga Destination: फक्त फिरण्यासाठीच नाही तर मन शांत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे; योगा करण्यासाठी नक्की भेट द्या

Yoga Day 2024 India: दैनंदिन जीवनात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यक्तींनी योगा करणे अत्यंत चांगले समजले जाते. त्यात उद्या आंतरराष्ट्रीय योगा दिन जगभरात साजरा केल्या जातो.
Yoga Day 2024 India
Yoga DestinationSaam Tv

व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात येतो. या वर्षीची २१ जून रोजी जगभरात योग दिन साजरा करण्यात येणार आहे.

Yoga Day 2024 India
Healthy Lifestyle : निरोगी जीवन जगण्यासाठी आजच 'हे' 5 बदल करा !

प्राचीन काळापासून दैंनदिन व्यायामाचा एक भाग योगा आहे. दररोज योगा केल्याने शरीर निरोगी राहण्यान महत्त्वाची मदत होते. साधारण १५०० वर्षांपासून भारतात योगा करण्यास सुरुवात झाली असावी असा समज आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीत प्रत्येक व्यक्तीचा योगा एक भाग बनला गेला. योगाचे महत्त्व समजल्यामुळे दरवर्षी २१ जून रोजी योग दिन जगभरात साजरा करण्यात येतो. २१ जून रोजी जगभरातील लोक योग करतात आणि अनेक आरोग्याच्या समस्येपासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून देतात.

योग (yoga)करणे हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर योगा केल्याने अनेक मानसिक फायदेही मिळतात. यामुळे व्यक्ती तणावमुक्त राहतो शिवाय दिवसभर काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते. अनेकदा तुम्ही पाहिल असेल अनेक व्यक्ती योगा करण्यासाठी शांत जागा शोधून काढतात. अनेकदा काही योगा प्रेमी योगा करण्यासाठी अनेक दिवस भारतातील अशा ठिकाणी जातात.जिथे शांतपणे योगा करता येऊ शकतो. चला तर आपणही भारतातील काही ठिकाणे पाहू जिथे तुम्ही योगा करणे पंसत कराल.

ऋषिकेश

ऋषिकेश(rishikesh) हे जगप्रसिद्ध असे ठिकाण आहे. तुम्हाला माहिती आहे का ऋषिकेशला भारताची योग राजधानी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक प्रसिद्ध आणि मोठे योग केद्रें आहेत. या ठिकाणी जाऊन तुम्ही योगाभ्यास जाणून घेऊ शकता. तसेच ऋषिकेशला गंगा नदीच्या काठावरही तुम्ही योगा करु शकता. ऋषिकेश या ठिकाणीही आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या ऊल्हासाने साजरा केला जातो. ज्यासाठी येथे जगभरातून लोक येत असतात.

गोवा

पर्यटनासाठी जगप्रसिद्ध (world famous)असे गोवा हे ठिकाण आहे. गोवा हे नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे मात्र तिथे तुम्ही योगा ही करु शकता. गोव्यामधील अंजुना आणि पालोलेम बीज जे पर्यटनासाठी अत्यंत गजबलेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला अनेक योग प्रशिक्षण केंद्रे दिसून येतील. या ठिकाणी अनेक योगाशी निगडीत कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

हिमाचल

भारतातील अनेक प्रसिद्ध असलेल्या ठिकाणापैंकी हिमाचल हे ठिकाणही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हिमाचलमध्ये अनेक ट्रेकर्स(Trekkers) ट्रेकिंगसाठी जात असतात मात्र योगा तसेच ध्यान करण्यासाठी हिमाचल अतिशय योग ठिकाण मानले जाते. हिमाचलमधील अनेक पर्वतांचे सौंदर्य पाहताना योगा करणे हा एक आयुष्यातील चांगला अनुभव ठरु शकतो.

केरळा

पावसाळ्या शिवाय अन्य दिवसातही केरळचे (kerala)सौंदर्य अधिक मनमोहक असते. मुख्य म्हणजे केरळला अनेकजण शांततापूर्ण ठिकाण मानतात. या शांत ठिकाणी योग करणे अत्यंत उत्तम ठरेल. केरळमधल्या हिरव्यागार वातावरणात योगाभ्यास करणे चांगले ठरते.

Yoga Day 2024 India
Healthy Lifestyle: 'या' सिंपल टिप्सने आयुष्यभर शरीर राहील तरुण आणि तंदुरुस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com