Tourist Places in Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय
Top 3 Tourist Places in Uttarakhand, RishikeshSaam TV

Tourist Places in Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय

Top 3 Places To Visit in Rishikesh: रात्रीच्यावेळी येथे होणारी विद्यूत रोषणाई पाहून तुमचेही डोळो दिपतील. तलावाच्या काठावर आरामासाठी बसण्यासाठी जागा देखील आहे. हे ठिकाण ऋषिकेशपासून केवळ ९० किलोमिटर अंतरावर आहे.
Published on

उन्हाळ्याच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक पर्यटनप्रेमी विविध ठिकाणे एक्सप्लोअर करत आहेत. आता तुम्हाला कमी बजेटमध्ये आणि कमी गर्दी असलेल्या ठिकाणी फिरायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी ऋषिकेशमधील काही सुंदर पर्यटनस्थळे शोधून आणली आहेत.

Tourist Places in Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय
Nanded Tourist Places: नांदेडमध्ये होणार पर्यटन क्षेत्राचा विकास? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं महत्वाचं वक्तव्य

डेडीताल तलाव

ऋषिकेशमध्ये जाऊन तुम्हाला नैनितालचा फिल घ्यायचा असेल तर उत्तकाशीमध्ये असलेल्या डोडीताल या तलावाला भेट द्या. हे तलाव आकाराने फार मोठं आहे. रात्रीच्यावेळी येथे होणारी विद्यूतरोषणाई पाहून तुमचेही डोळो दिपतील. तलावाच्या काठावर आरामात बसण्यासाठी जागा देखील आहे. हे ठिकाण ऋषिकेशपासून केवळ ९० किलोमिटर अंतरावर आहे.

लांदूर

उत्तराखंडमध्ये वसलेलं लांदूर म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं ठिकाण. येथे अतिशय शांतात आणि फक्त निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळतं. उन्हाळ्यात देखील येथे अतिशय थंड आणि शांत वारे वाहतात. तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्र परिवारासह तुम्ही या ठिकाणी आवश्य भेट देऊ शकता.

कानातल

उत्तराखंडमध्ये अनेक सुंदर पर्यटन स्थळं आहेत. मात्र येथे भेट दिल्यावर सर्वत्र माणसांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आम्ही येथील एक शांत ठिकाण शोधून काढलं आहे. कानातल ही जागा उंच टेकडी आणि डोंगरांवर आहे. येथून संपूर्ण शहर अगदी चित्रपट आणि कथेतील सुंदर वास्तूंप्रमाणे असल्याचं दिसतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुम्ही देखील स्वत:च्या आणि मामाच्या गावी जाऊन कंटाळले असाल आणि ऋषिकेशला जाण्याचा प्लान केला असेल तर ही निवडक ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम आहेत.

Tourist Places in Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय
Tourist Viral Video : थायलंड आणि बालीचा फिल भारतात; उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com