कोमल दामुद्रे
सह्याद्रीच्या कुशीत अनेक गडकिल्ले आहेत ज्यांची पर्यटकप्रेमींना भुरळ पडते.
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असेललं कळसुबाई शिखर हे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आवडते ठिकाण आहे.
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
या शिखरावरुन सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील गडकिल्ले आणि निसर्गांचं सौंदर्य पाहाता येते.
शिखराच्या पायथ्याशी बारी हे गाव असून मुंबई ते कळसुबाई १५६ किमी, पुण्यापासून १७० किमी तर नाशिकपासून ६० किमी अंतरावर आहे.
कळसुबाई हे शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं आहे. या ठिकाणी कळसुबाई देवीचं छोटे मंदिर आहे.
कळसुबाई हे शिखर अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे.
कळुसबाई शिखराच्या टोकावर पोहोचल्यावर घनदाट जंगले, धबधबे आणि वाहणारा प्रवाह पाहायला मिळतो.