Healthy Lifestyle : निरोगी जीवन जगण्यासाठी आजच 'हे' 5 बदल करा !

Lifestyle Tips : तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करून चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवू शकता.
Healthy Lifestyle
Healthy Lifestyle Saam Tv
Published On

Healthy Lifestyle : अनिश्चित जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यासंबंधित अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे मानसिक आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल प्रश्न सतत निर्माण होतो. पण नीट पाहिलं तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी ठेवणे तितकं अवघड नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करून चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया दैनंदिन दिनचर्येत छोटे मोठे बदल करून निरोगी जीवनशैली मिळवण्याच्या ५ सवयींबद्दल

Healthy Lifestyle
Habits That Make You Instantly Likeable : सगळ्यांच्या मनावर गाजवायच आहे अधिराज्य ! आपल्या दैनंदिन जीवनात 'या' सवयींना फॉलो करा

1. नियमित व्यायाम

तुम्हाला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर रोज व्यायम करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अनेक प्रकारे फायदा (Benefits) होतो. व्यायम केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यासाठी तुम्ही जिमला जाणे गरजेचे नाही. घरातील कामे करून देखील तुम्ही फिट राहू शकता. त्यासोबतच वेगाने चालणे,नृत्य करणे, सायकल चालवणे फायदेशीर ठरते.

2. प्रोसेस्ड फुड खाणे टाळा

प्रोसेस्ड फुड (Food) म्हणजेच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ होय. अर्थात प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून निरोगी आरोग्यासाठी प्रोसेस्ड फुड खाणे टाळावेत. अशा वेळेस पौष्टिक अन्नपदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असते.

3. धूम्रपान करू नये

तुम्हाला जर धूम्रपान करण्याची सवय असेल तर ती त्वरित बंद करा. खरं तर ,ही एक अशी सवय आहे जी सर्वप्रथम सोडली पाहिजे. त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि दीर्घआयुष्य लाभेल.

Healthy Lifestyle
5 Bad Habits : वयाच्या २५ व्या वर्षी वृद्ध बनवतील तुमच्या 'या' ५ सवयी, चेहऱ्यावर दिसू लागतील सुरकुत्या !

4. झोपेला प्राधान्य द्या

व्यक्तीला निरोगी आयुष्य (Lifestyle) जगण्यासाठी रोज सात ते आठ तासाची झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक ऊर्जा वाढवण्यास मदत मिळते. जर तुम्ही दररोज पुरेशी झोप घेत नसाल तर मानसिक तणाव वाढतो आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येतो. यामुळे नियमित झोप घेणे गरजेचे आहे.

5. हायड्रेट रहा

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी (Water) पिणे गरजेचे असते. त्यामुळे शरीरातील अर्ध्या समस्या कमी होऊ शकतात. जसे की पचनास मदत होते, शरीराचे तापमान राखणे, आपल्या अवयव योग्यरीत्या कार्य करणे, सर्व पेशींमध्ये पोषक द्रव्य वाहून नेणे. हायड्रेट राहिल्याने मेंदूचे कार्य अधिक चांगले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com