

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा उत्सव असतो. शास्त्रांनुसार महाशिवरात्रि व्रत, पूजा आणि जागरण केल्यास पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते. 2026 मध्ये महाशिवरात्रि 15 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. पुढे आपण सोप्या थोडक्यात व्रताबद्दल जाणून घेणार आहोत.
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करावा. शक्य असल्यास फळांचा आहार किंवा निर्जळी उपवास करावा आणि दिवसभर संयम पाळावा. शक्यतो तुमच्या क्षमतेनुसार उपवास करावा.
शिवलिंगावर जल, दूध, दही, मध, तूप अर्पण करून बेलपत्र, धोत्रा आणि फुलं वाहावीत. “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप करावा. त्याने नक्कीच फळ मिळतं असं मानलं जातं.
या दिवशी रात्रभर जागरण करून चार प्रहरांत शिवपूजा आणि आरती करणं शुभ मानलं जातं. शिवभजन व स्तोत्रपठण केल्याने मनःशांती मिळते.
व्रताचे पारण दुसऱ्या दिवशी सकाळी करावं. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दान केल्यास पुण्य लाभतं. महाशिवरात्री व्रत श्रद्धा आणि नियमाने केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
डिस्क्लेमर: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.