Sakshi Sunil Jadhav
फेब्रुवारी महिना म्हणजे थंड हवामान, स्वच्छ आकाश आणि रोड ट्रिपसाठी परफेक्ट वेळ. मुंबईकरांसाठी गर्दीपासून लांब, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल अशी अनेक हिडन ठिकाणं आहेत.
मुंबईत असूनही हिरवळ, टेकड्या आणि शांत वातावरण, गुलाबी फुलांचा वर्षाव येथे पाहायला मिळतो. मॉर्निंग ड्राइव्ह आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिराण परफेक्ट आहे.
भांडुप परिसरात असलेलं हे तलावाचं ठिकाण फारसं प्रसिद्ध नाही. शांतता, पक्षीनिरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.
आरे कॉलनी फक्त फिल्मसिटीपुरती मर्यादित नाही. इथली कमी वाहनांचे शांततेचे रस्ते आणि जंगलाचा भाग रोड ट्रिपसाठी वेगळाच अनुभव देतात.
मुंबईपासून थोड्या अंतरावर असलेला हा निसर्गरम्य मार्ग फेब्रुवारीत हिरवळीने नटलेला असतो. शांत वातावरणासाठी योग्य आहे.
लोकल ट्रेनने प्रसिद्ध असलेलं भिवपुरी, रोड ट्रिपसाठीही उत्तम आहे. धबधबे, डोंगररांगा आणि कमी ट्रॅफिक हा प्लस पॉइंट आहे.
नवी मुंबईजवळ असलेला हा कोस्टल रोड अजूनही अनेकांना माहीत नाही. समुद्रकिनारा, मोकळे रस्ते आणि शांतता अनुभवता येते.
माळशेजचा मुख्य घाट टाळून जाणारे हे मार्ग कमी गर्दीचे आणि निसर्गसंपन्न आहेत. फेब्रुवारीत ड्राइव्हसाठी खास.
ठाणे जिल्ह्यातील तानसा तलाव परिसर अजूनही फारसा पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जात नाही. शांत रोड ट्रिपसाठी योग्य आहे.