Mahashivratri 2026 date and time saam tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2026 Date: महाशिवरात्रीचा उपवास कोणत्या दिवशी धरावा? पाहा तिथी आणि शुभ मुहूर्त

Mahashivratri 2026 date and time: भगवान शिवाची आराधना करण्यासाठी महाशिवरात्री हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, रात्रभर जागरण आणि शिवलिंगाची पूजा केली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हा सण देवांचा देव भगवान शिव आणि विश्वाची देवी पार्वती यांना समर्पित आहे. या शुभ दिवशी शिव आणि शक्तीची भक्तीभावाने पूजा करण्यात येते. एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीला उपवास देखील पाळला जातो.

धार्मिक मान्यता अशी आहे की, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. शिवाय यामुळे घरात सुख, समृद्धी आणि कल्याण येते. या शुभ दिवशी भगवान शिवासाठी विशेष जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्रीची नेमकी तारीख आणि शुभ वेळ काय आहे ते जाणून घेऊया.

कधी आहे महाशिवरात्री?

वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:३४ वाजता सुरू होणार आहे. चतुर्दशी तिथी १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता संपणार आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रात्री भगवान शिवाची पूजा केली जाते. यासाठी महाशिवरात्री १५ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी कधी केली जाणार पूजा?

महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०५:५४ ते ०९:०३ या वेळेत पूजा करता येते. त्यानंतर पूजा करण्याची शुभ वेळ रात्री ०९:०३ ते १२:१२ आहे. या वेळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते असं मानलं जातं. दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी तुम्ही उपवास सोडू शकता.

महाशिवरात्री योग

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजेच महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योगाने दुर्मिळ संयोग बनतायत. यासोबतच अभिजित मुहूर्ताचा देखील संयोग होताना दिसतोय. शिवाय महाशिवरात्रीला भाद्रवास योग देखील आहे. या योगात देवी पार्वतीसह भगवान शिवाची पूजा केल्यास भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

पंचांग

  • सूर्योदय - सकाळी ०६:३२

  • सूर्यास्त - संध्याकाळी ५:५४

  • ब्रह्म मुहूर्त - पहाटे ०४:५० ते ०५:४१ पर्यंत

  • विजय मुहूर्त - दुपारी 02:06 ते 02:52 पर्यंत

  • संधिप्रकाश वेळ - संध्याकाळी ०५:५१ ते ०६:१७ पर्यंत

  • निशिता मुहूर्त - दुपारी 11:47 ते 12:38 पर्यंत

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Fall Control: केस होतील मुलायम अन् मजबूत; रोज फॉलो करा ही १ ट्रिक

Gram Panchaya Elections: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, नंतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार; 14 वर्षीय पीडित मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सुनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

SCROLL FOR NEXT