Manasvi Choudhary
मसूरची डाळ केवळ आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी फायदेशीर आहे. मसूरच्या डाळीचा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याला लावल्याने टॅन कमी होतो.
मसूर डाळीचा फेस पॅक घरी कसा बनवायचा हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
मसूर डाळ, टोमॅटो आणि कोरफड हे तीन मिक्स करून त्याची एकत्र पेस्ट करा.
हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर जिथे टॅनिंग झाले आहे तिथे लावा आणि मसाज करा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
मसूरच्या डाळीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होतात.
चेहऱ्यावर मसूर डाळ लावल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस देखील कमी होण्यास मदत होते.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा मसूरच्या डाळीचे हा फेसपॅक चेहऱ्याला लावा यामुळे तुम्हाला फायदा होईल.