Ahaan Panday: २०२५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट "सैयारा" नंतर एका रात्रीत स्टार बनलेला अभिनेता अहान पांडेने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर, अहान पांडे खूप कठीण परिस्थितीतून जात होता. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अहानने खुलासा केला की 'सैयारा' प्रदर्शित झाल्यानंतर त्याची सर्जरी झाली, यातून बरा होण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. म्हणूनच तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बराच काळ प्रसिद्धीझोता पासून दूर राहिला. इतका मोठा हिट चित्रपट दिल्यानंतर चाहत्यांचा आवडता स्टार कुठे गायब झाला असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
सर्जरी करण्याचा निर्णय घेतला...
इन्क्वायरर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अहान पांडेने खुलासा केला की त्याला खांद्याची सर्जरी करावी लागली. काही वर्षांपूर्वी स्नोमोबाईल अपघातात त्याच्या खांद्याला सबलक्सेशन झाले होते. या जुन्या दुखापतीमुळे त्याला त्याच्या पुढील अॅक्शन चित्रपटासाठी प्रशिक्षण घेणे आणि त्याच्या फिटनेसकडे लक्ष देणे कठीण होत होते. त्याच्या कारकिर्दीत त्रास होऊ नये म्हणून अहानला या समस्येचे निराकरण करायचे होते. म्हणूनच त्याने एक छोटा ब्रेक घेऊन त्याच्या खांद्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी अहानला दिली चेतावणी
अहानने सांगितले, "गेल्या वर्षी 'सैयारा' प्रदर्शित झाल्यानंतर मी ही सर्जरी केली. मला यामुळे खूप त्रास झाला आणि बरं होण्यासाठी बराच वेळ लागतो. डॉक्टरांनी त्याला आधीच इशारा दिला होता की शस्त्रक्रियेनंतर त्याला खूप त्रास होईल. म्हणजेच, 'सैयारा'साठी त्याने बनवलेले बॉडी जाईल आणि त्याला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागेल.
अहान पांडेचा पुढील चित्रपट
अहान पांडे म्हणाला की सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळे प्रेक्षकांच्या ही गोष्ट ऐवढी लक्षात आली नाही. कामाच्या बाबतीत, अहान पांडे सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी करत आहे. हा एक मोठ्या बजेटचा अॅक्शन चित्रपट असणार आहे, यासाठी अहानने पुन्हा त्याच्या शरीरावर काम करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.