High Blood Pressure: तिशीतल्या तरुणांमध्ये वाढतोय BPचा त्रास अन् वयाच्या पन्नाशीत येतो हार्ट अटॅक, संशोधनातून डॉक्टरांनी केलं स्पष्ट, वाचा कारणं

Hypertension: तिशीत वाढणारा बीपी हा भविष्यातील हार्ट अटॅकचा मोठा इशारा ठरू शकतो. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि ताण यामुळे धोका वाढतो, डॉक्टरांनी दिला इशारा.
Hypertension
Study Reveals Early Hypertension Could Lead to Serious Heart Issues Latergoogle
Published On

बदलत्या जीवनशैलीमध्ये उशीरा उठणे, बाहेरचे महागडे पदार्थ जास्त खाणे, रात्री महत्वाची कामे करणे आणि उशीरा उठणे असा बदल झालेला पाहायला मिळतोय. ही सवय प्रत्येकालाच त्यांच्यावेळेनुसार बरोबर वाटते, पण प्रत्यक्षात तसं नसतं. तुम्ही जर वयाच्या तिशीत किंवा तरुणपणीच जर यात बदल केले नाहीत तर काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. यासगळ्या समस्या हार्टशी संबंधित असतात.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांना वयाच्या तिशीतच हाय ब्लड प्रेशरच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. याचं कारण त्यांनी तरुणपणी केलेली चूक आहे. तज्ज्ञांच्या मते तुम्हाला तिशीत असलेला रक्तदाब तुमच्या पन्नाशीतल्या ह्रदयविकाराच्या धोका इशारा असू शकतो. त्यामुळे ही समस्या अजिबात हलक्यात घेऊ नका.

Hypertension
Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

मुळात बीपीचा धोका फक्त १४०/९० या आकड्यानंतरच सुरु होत नाही, तर १२०/८० या सामान्य पातळीपासूनच धोका वाढत असतो. जेव्हा याची लागण होते, तेव्हा त्यापासून वाचणं कठीण होऊन जातं. बऱ्याचदा तुम्हाला रिडींगवर धोका कमी असल्याचं जाणवतं. पण त्यामुळे उपचार थांबवणं किंवा डाएट न फॉलो करणं धोक्याचं ठरु शकतं. कारण यामध्ये तुमच्या रक्तवाहिन्याचं आतून नुकसान झालेलं असतं.

तज्ज्ञांच्या संशोधनात महिलांनाही याचा धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं. तसेच तरुणांमध्ये डायस्टोलिक BP जास्त महत्वाचा असतो. कारण यामध्ये रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम आणि शरीरातली तणावाची स्थिती कळते. १२०/७० पेक्षा कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये दीर्घकाल असणारा हृदयविकाराचा धोका सर्वात कमी दिसतो. त्यामुळे फक्त १३०/८० किंवा १४०/९० या मर्यादेखाली राहण्यापेक्षा त्याहून कमी पातळी गाठण्याचा प्रयत्न करणं गरजचं आहे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार केले पाहिजेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hypertension
Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com