Sakshi Sunil Jadhav
दारूच नाही तर आपल्या दैनंदिन सवयीही लिव्हरला खूप नुकसान पोहोचवतात. त्यामुळे तुम्ही वेळीच लक्षणं ओळखायच्या आधी डेली रुटीन फॉलो करा.
अनेकांना वाटतं की फक्त दारूमुळेच लिव्हर खराब होतो, पण चुकीच्या जीवनशैलीमुळेही त्यावर परिणाम होऊ शकतो.
रोज खाल्लं जाणारं जंक फूड, पॅकेज्ड पदार्थ लिव्हरमधला फॅट वाढवतात.
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने लिव्हरमध्ये चरबी साचते आणि आजारांचा धोका वाढतो.
मैद्याचे पदार्थ, बेकरी आयटम्स लिव्हरवर ताण आणतात. त्यामुळे घरचं खाणं सुरु करा.
अपुरी झोप मेटाबॉलिझम बिघडवते आणि लिव्हरची कार्यक्षमता कमी करते.
जास्त स्ट्रेसमुळे हार्मोनल असंतुलन होतं. ज्याचा परिणाम लिव्हरवर होतो.
सतत खराब सवयींमुळे शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो. जो लिव्हरसाठी घातक ठरतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.