Sakshi Sunil Jadhav
झोप ही प्रत्येकाच्या जगण्यातला एक अविभाज्य घटक मानली जाते. कारण जर ती पूर्ण झाली नाहीतर दिवस वाया गेल्यासारखं वाटतं.
अनेकांना कामानिमित्त सलग काही तास काम करावं लागतं. मग त्यांना झोप मिळत नाही. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.
काही लोकांना झोपेसाठी वेळ मिळत असला तरी झोप लागत नाही. त्यांना निद्रानाशेच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
झोप लागत नसेल तर तुम्ही Sleep Apnea या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं.
तुम्हाला या आजारात श्वास घेताना त्रास होऊ शकतो. कधीकधी झोपेत श्वास अचानक काही वेळासाठी थांबूही शकतो. अशावेळेस तुम्हाला शरीर प्रतिक्रीया देऊन तुम्हाला जागं करतं.
तुम्हाला यामुळे हार्टवर जास्त प्रेशर द्यावं लागतं. मग त्याच्याही वेगळ्या समस्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं.
तज्ज्ञांच्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, जगात या आजाराचे रुग्ण ७१ टक्क्यांहून जास्त आहेत.
तज्ज्ञांच्या मते, या आजाराचे कारण हे वाढतं वजन आहे. तसेच जीवनशैलीतले बदल सुद्धा आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.