High Blood Pressure Risk : उन्हामुळे वाढेल BPचा धोका, डॉक्टरांनी सांगितली सुरुवातीची 7 लक्षणं, वेळीच घ्या जाणून

High Blood Pressure Risk In Summer: उन्हाळ्यात वाढणाऱ्या तापमानामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. डोकेदुखी, चक्कर, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास अशी ७ लक्षणे दिसल्यास त्वरित रक्तदाब तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
High Blood Pressure Risk In Summer
Doctors Warngoogle
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक सवयींमध्ये हालचालींमध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहेत. लोक रात्रभर जागून काम करतायेत आणि दिवसा आराम. त्यात काहींचा प्रवासात खूप वेळ जातो. कामात खूप वेळ जातो याने स्वत: च्या आयुष्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. काही पालकांनी म्हणजेच वयाची तिशी ओलांडल्या नंतर बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं.

मुलांच्या संगोपणाकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागतं. त्याने तुमच्या शरीरात काय बदल होतायेत हे पाहायला तुम्हाला वेळच मिळत नाही. मग तुम्हाला ३० किंवा ४० वयातच हार्ट अटॅक संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याची सुरुवात किंवा लक्षणं अनेक आजारांपासून होते. त्यातला एक जीवघेणा आजार म्हणजे उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आहे.

High Blood Pressure Risk In Summer
Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

डॉक्टर म्हणतात, बऱ्याचदा वाढत्या BPच्या समस्या किंवा लक्षणं आधीच जाणवत नाहीत. त्यामुळे तुमच्या शरीरातल्या हालचालींकडे वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे. त्यातली सामान्य वाटणारी लक्षण म्हणजे, डोकंदुखी, थकवा किंवा शरीरातली सूज ही असतात. जेव्हा तुमच्या शरीरातला रक्तदाब वाढतो, तेव्हा तुम्हाला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकच्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सतत ही लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे जाऊन एकदा ब्लड प्रेशर तपासून घ्या. याने भविष्यातला धोका टाळता येऊ शकतो.

गुरुग्राम येथील Marengo Asia Hospitals मधील कार्डिओलॉजी विभागाचे चेअरमन डॉ. संजीव चौधरी यांच्या प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, तुम्हाला वाढत्या ब्लड प्रेशरचा त्रास उन्हाळ्यात जास्त जाणवू शकतो. कारण ही लक्षणं वाढत्या उन्हामुळे झालीत असा अनेकांचा समज असतो. त्यामध्ये सतत होणारी डोकंदुखी, चक्कर, डोळ्यासमोर अचानक अंधार येणं, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, नाकातून रक्त येणं आणि सतत थकवा जाणवणं ही उच्च रक्तदाबाची संभाव्य लक्षणं असू शकतात. ही लक्षणे सतत दिसत असतील तर BP तपासणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण उपचार न केल्यास उच्च रक्तदाबामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

High Blood Pressure Risk In Summer
LPG Subsidy Check: गॅस सबसिडी मिळत नाहीये? मोबाईलवरून 2 मिनिटांत तपासा LPG सबसिडी Status

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com