

सध्या घरातल्या मुलभूत गरजांमध्ये गॅस सिलेंडरवरचा समावेश होतो. सध्या याच्याच नियमात मोठे बदल केले आहेत. त्यातच देशातल्या अनेक कुटुंबांना घरगुती गॅस सिलेंडरवर सरकारकडून LPG सबसिडी दिली जाते. पण बऱ्याचदा ही सबसिडी बँक खात्यात जमा झाली आहे की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. काही वेळा सबसिडी खात्यात दिसत नाही किंवा ती उशिरा जमा होते. त्यामुळे तुमच्या खात्यात LPG सबसिडी येते की नाही येत, हे त्या-त्या वेळी तपासणं महत्त्वाचे असतं. पण आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून ऑनलाइन तपासू शकता.
LPG सबसिडीचे स्टेटस तपासण्यासाठी सगळ्यात आधी mylpg.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवर गेल्यानंतर इंडेन, एचपी गॅस किंवा भारत गॅस यापैकी आपल्या गॅस कंपनीची निवड करावी लागते. त्यानंतर ग्राहक क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा. जर आधी नोंदणी केलेली नसेल तर नवीन नोंदणी करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.
लॉग इन केल्यानंतर View Cylinder Booking History किंवा View Subsidy Status असा पर्याय दिसतो. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यात जमा झालेल्या सबसिडीची माहिती तिथे वाचून घ्या. ईथे सबसिडीची रक्कम आणि ती कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे याची संपूर्ण माहिती दिसते.
अनेकदा लोकांना सबसिडी मिळत नाही कारण त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते योग्य प्रकारे लिंक केलेलं नसतं. सबसिडी थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार नंबर NPCI मॅपिंगसाठी लिंक असणं आवश्यक आहे. जर सबसिडीची एंट्री दिसत नसेल तर तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का, याची खात्री करणं गरजेचं आहे. तसेच काही वेळा जुनी बँक खाती लिंक असल्यामुळेही सबसिडी चुकीच्या खात्यात जमा होऊ शकते. म्हणूनच LPG सबसिडीचा लाभ नियमित मिळत आहे की नाही, याची पडताळणी वेळोवेळी ऑनलाइन करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.