

सर्दी-खोकला ही समस्या जशी सगळ्यांसाठी कॉमन असते. त्याच प्रकारे आता उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्याही कॉमन झाली आहे. WHO संघटनेच्या माहितीनुसार BP चा वाढत्या समस्येमुळे अनेक रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागतोय. याचा आकडा हा 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार १.२८ अब्ज इतका आहे. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी यावर उपचार करणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते ज्यांचे वय ३० ते ७९ च्या आत आहे, त्यांना BP चा धोका जास्त प्रमाणात असतो. त्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अनेकांना हा आजार कधी झालाय याची कल्पनाच नसते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असेही म्हटलं जातं. हा आजार हळूहळू रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करतो आणि हृदयविकार, स्ट्रोक तसेच किडनीच्या समस्यांचा धोका वाढवतो.
तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी उपचार करणं आणि योग्य आहार घेतल्यावर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येतं. महत्वाचं म्हणजे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणं टाळा. कॅन सूप, फ्रोजन डिनर, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रोसेस्ड मांसामध्ये यांसारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असतं. त्याने शरीरात जास्त प्रमाणात पाणी साचू शकतं.
तसेच शुगर फ्री ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई आणि खजूर यामुळे बीपीचा त्रास वाढू शकतो. अशा पदार्थांमुळे लठ्ठपणा, सूज आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडतं आणि रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. त्याऐवजी साधं पाणी, शुगर फ्री ड्रिंक्स आणि हेल्दी स्नॅक्स निवडणं जास्त फायदेशीर ठरतं.
ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थही धोकादायक मानले जातात. रेड मीट, लोणची, कॅन फूड, फुल-फॅट डेअरी उत्पादनं आणि प्रक्रिया केलेले मांस रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार करतात. त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, अशा पदार्थांऐवजी मासे, कडधान्ये, कमी फॅट असलेले डेअरी पदार्थ आणि वनस्पतीजन्य फॅट्सचा वापर करावा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.