Mango Jam Recipe: या २ पदार्थांचा वापर करुन बनवा मॅंगो जाम, वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

आंब्यांचा ऋतू

प्रत्येकाच्या घरात उन्हाळ्यात आंबे आणतात. पण जर का ते पिकलेले असतानाच खाल्ले नाहीत, आंबे खराब होऊ शकतात.

Mango Jam Recipe

मॅंगो जाम रेसिपी

तुम्ही अशावेळी घरच्याघरी पिकलेल्या आंब्यांचा जाम तयार करू शकता. चला जाणून घेऊयात याची स्टेप बाय स्टेप रेसिपी.

Mango Jam Recipe

साहित्य

२ कप पिकलेल्या आंब्यांचा गर, १ कप साखर, १ चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा वेलची पूड इ.

homemade mango jam

स्टेप १

सर्वप्रथम पिकलेले आंबे सोलून घ्या. मग त्याचा गर चमच्याच्या साहाय्याने काढा.

homemade mango jam

स्टेप २

आता संपूर्ण गर एका जाड पातेल्यात ठेवा. मग त्यात साखर मिक्स करा.

how to make mango jam

स्टेप ३

पुढे स्लो गॅसवर हे मिश्रण गरम करा. त्यासोबत ते सतत ढवळत राहा.

how to make mango jam

स्टेप ४

मिश्रणाचा रंग बदलत राहील. तोपर्यंत तुम्ही ते ढवळत राहा. त्याने एकसमान मिश्रण शिजेल.

how to make mango jam

स्टेप ५

शेवटी जेव्हा मिश्रण घट्ट होईल, तेव्हा त्यात लिंबाचा रस घाला. याने जॅमला चव येईल.

how to make mango jam

स्टेप ६

आता जॅम एकदम घट्ट झाला असेल तर गॅस बंद करा. त्याला संपूर्ण थंड करा आणि काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करुन ठेवा.

how to make mango jam

NEXT: पुण्यातली फेमस मँगो मस्तानी कशी बनवायची? रेसिपी लगेच करा फॉलो

Mango Mastani Recipe
येथे क्लिक करा