Heart Attacks : तुम्हालाही हॉर्ट अटॅकचा धोका आहे का? जाणून घ्या ९९% रुग्णांमध्ये आढळणारे 'हे' ४ भयानक कारणं

Heart Disease: हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, रक्तातली साखर आणि तंबाखू यांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Heart Attacks
Heart Attacksmeta ai
Published On: 

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयीत मोठा बदल झालेला आहे. हाय ब्लड प्रेशर, वाढलेले कोलेस्टेरॉल, रक्तातल्या साखरेचं प्रमाण आणि तंबाखूचं सेवन हे हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे चार महत्त्वाचे घटक मानले जातात. विशेष म्हणजे, यापैकी काही समस्या शरीरात दीर्घकाळ असल्या तरी सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि लाइफस्टाइलला जास्त महत्त्व आहे.

हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे ४ प्रमुख घटक

रक्तदाब जास्तवेळ वाढलेला असेल तर रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊन ह्रदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. रक्तदाब नियमित तपासणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणं आवश्यक आहे.

वाढलेले कोलेस्टेरॉल (High Cholesterol)

रक्तातले खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL वाढ रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमा होऊ शकतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होण्याचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आवश्यकतेनुसार लिपिड प्रोफाइल तपासणी करून घ्यावी.

Heart Attacks
Sarva Pitri Horoscope: सर्वपित्री अमावस्याला या ५ राशींचे नशीब पालटणार; पैशांचा पाऊस पडणार, तुमची रास यात आहे का?

वाढलेली रक्तातील साखर आणि डायबेटीज

रक्तातली साखर जास्त नियंत्रणात नसेल तर रक्तवाहिन्या आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. डायबेटीज किंवा प्री-डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी रक्तातल्या साखरेची नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान

सिगारेट, बिडी तसेच तंबाखूच्या इतर प्रकारांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका वाढतो. तंबाखू पूर्णपणे सोडणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

Heart Attacks
PF Withdrawal Alert: PF चे पैसे काढण्याचे नियम बदलले! Form 15G आणि 15H बंद; आता कोणता फॉर्म भरावा लागणार?

हार्ट अटॅकची कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?

१. छातीत दुखणे, दडपण किंवा जडपणा जाणवणं.

२. हात, मान, जबडा किंवा पाठीकडे वेदना होणं.

३. अचानक धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणं.

४. मळमळ, थंड घाम किंवा असामान्य थकवा जाणवणं. ही लक्षणे दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांची मदत घ्या. छातीत तीव्र वेदना किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर स्वतःहून वाहन चालवण्याऐवजी आपत्कालीन मदत घ्या.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

१ . रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर रोज तपासा.

२. संतुलित आहार घ्या आणि मीठ, साखर आणि फॅटचं प्रमाण मर्यादित ठेवा.

३. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज व्यायाम करा.

४. धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद करा.

५. वजन नियंत्रणात ठेवा आणि पुरेशी झोप घ्या.

महत्त्वाचे: हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार यामुळे धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, भारतातील ९९ टक्के हार्ट अटॅक या चार घटकांमुळेच होतात, असा ठोस दावा करण्यासाठी विश्वसनीय संशोधनाचा संदर्भ आवश्यक आहे. साम टिव्ही याचं समर्थन अथवा दावा करीत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com