PF Withdrawal Alert: PF चे पैसे काढण्याचे नियम बदलले! Form 15G आणि 15H बंद; आता कोणता फॉर्म भरावा लागणार?

EPFO Update: पीएफमधून पैसे काढताना टीडीएससाठी Form 15G आणि 15H ऐवजी Form 121 वापरला जाणार आहे. पात्रता, पॅन कार्डसह अनेक कागदपत्रे तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे.
PF Withdrawal Alert
PF Withdrawal Alertmeta ai
Published On: 

सर्व कर्मचारी त्यांच्या पगारातला काही भाग भविष्यासाठी जमा करत असतात. कधी मोठा खर्च करायचा असेल तर किंवा लग्नासाठी हाच जमा केलेला पीएफ (PF) खूप कामी येतो. पीएफ खात्यातून पैसे काढताना टीडीएस (TDS) कापला जाऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत Form 15G किंवा Form 15H भरता येत होता. पणस नव्या करांच्या नियमांनुसार आता या फॉर्मऐवजी Form 121 वापरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून हा बदल लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पीएफमधून पैसे काढण्याचा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या नव्या नियमाची माहिती घेणं महत्त्वाचं आहे.

Form 15G आणि Form 15H मध्ये काय बदल झाला?

पीएफमध्ये यापूर्वी पात्र कर्मचाऱ्यांना पीएफ काढताना टीडीएस टाळण्यासाठी Form 15G भरता येत होता. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी Form 15H वापरला जात होता. आता नव्या नियमानुसार या दोन्ही फॉर्मऐवजी Form 121 वापरण्याची तरतूद आहे. पण फॉर्म भरला म्हणजे टीडीएस कापला जाणारच असं नाही. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने आवश्यक अटी पूर्ण करणं गरजेचे आहे.

PF Withdrawal Alert
DA Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ; आता थेट 'इतका' वाढून मिळणार पगार

Form 121 म्हणजे काय?

Form 121 हा आपल्या अंदाजित वार्षिक उत्पन्नावर आयकर देय नाही हे घोषित करण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म आहे. पीएफमधून पैसे काढताना नियमानुसार टीडीएस लागू होऊ नये, यासाठी पात्र कर्मचारी या फॉर्मद्वारे विनंती करू शकतात.

PF Withdrawal Alert
Sarvapitri Amavasya Date : सर्वपित्री अमावस्या कधी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्वाचे उपाय

Form 121 भरण्यासाठी कोण पात्र?

Form 121 भरण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत.

१. संबंधित कर्मचारी भारतातील निवासी करदाता असणे आवश्यक आहे.

२. त्याचे अंदाजित एकूण उत्पन्न आयकर देय नसण्याच्या निकषात बसले पाहिजे.

३. कर्मचाऱ्याकडे पॅन कार्ड (PAN) असणे आवश्यक आहे.

४. अनिवासी भारतीयांना (NRI) या फॉर्मचा लाभ घेता येणार नाही. या अटी पूर्ण असतील तरच संबंधित कर्मचाऱ्याला फॉर्मचा वापर करता येईल.

Form 121 ऑनलाइन भरता येणार?

Form 121 भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी व्यवस्था विकसित केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फॉर्म भरणे जास्त सोपं होऊ शकते. तसेच प्रत्येक फॉर्मला स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याचीही तरतूद अपेक्षित आहे.

कर्मचाऱ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे?

पीएफमधून पैसे काढण्यापूर्वी नवीन फॉर्म, टीडीएसचे नियम आणि आपली पात्रता तपासून घ्या. केवळ Form 121 भरल्याने टीडीएसमधून आपोआप सूट मिळत नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी EPFO आणि आयकर विभागाच्या अधिकृत सूचनांची खात्री करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com