Sarvapitri Amavasya Date : सर्वपित्री अमावस्या कधी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्वाचे उपाय

Sakshi Sunil Jadhav

सर्वपित्री अमावस्या तारीख

यंदा सर्वपित्री अमावस्या ही १० ऑक्टोबर रोजी, शनिवार असणार आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी श्राद्ध केलं जातं.

Sarvapitri Amavasya 2026

अमावस्या तिथी

पंचांगानुसार, अमावस्या तिथी ९ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल आणि १० ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी समाप्त होईल.

Sarva Pitru Amavasya date

कुतुप मुहूर्ताची वेळ

पितरांच्या श्राद्धासाठी महत्त्वाचा मानला जाणारा कुतुप मुहूर्त सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल.

Sarva Pitru Amavasya date

रोहिणी मुहूर्त

श्राद्ध आणि तर्पणासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार, रोहिणी मुहूर्त दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपासून १ वाजून १८ मिनिटांपर्यंत असणार आहे.

Sarvapitri Amavasya date 2026

अपराह्न काळ

श्राद्ध करण्याचं महत्त्व पितरांच्या श्राद्धासाठी महत्त्वाचा मानला जाणारा अपराह्न काळ दुपारी १ वाजून १८ मिनिटांपासून ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असणार आहे.

Shraddha rituals

अमावस्येचे महत्त्व

पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसलेल्या किंवा पितृपक्षात श्राद्ध करता न आलेल्या व्यक्तींना या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करता येतं, अशी धार्मिक मान्यता आहे.

Rohini Muhurat

पितरांसाठी विधी

तुम्ही या दिवशी धार्मिक परंपरेनुसार तर्पण, पिंडदान आणि पूर्वजांचं स्मरण करायचे असते. नंतर गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा इतर दानधर्म केला जातो.

Sarvapitri Amavasya Marathi

शारदीय नवरात्र कधी असेल?

दिलेल्या पंचांगाच्या माहितीनुसार, सर्वपित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२६ पासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. पण नवरात्राची तारीख स्थानिक मुहूर्त पंचांगानुसार तपासावेत.

Sarvapitri Amavasya Marathi

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Sarvapitri Amavasya Marathi

NEXT : पनीर की सोयाबीन? ५० रुपयांत शरीराला जास्त प्रोटीन कोण देतं? न्यूट्रिशनिस्टचा मोठा खुलासा

soy chunks protein
येथे क्लिक करा