Health Tips : चहासोबत हे पदार्थ खाणे ठरू शकते घातक, वेळीच काळजी घ्या!

Tea Tips : आपल्यापैंकी अनेकजणांची सकाळची सुरुवात ही गरमागरम चहा पिऊन होते. परंतू जर तुम्ही चहा सोबत काही पदार्थ खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
Tea Tipa
Health TipsSaam Tv
Published On

जगभरात चहा मोठ्या प्रमाणात पिला जातो. भारतात चहाबाबत वेगळीच क्रेज आहे. सकाळी उठल्या उठल्या चहा पिणे हा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर चहासोबत काही पदार्थ खाले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

Tea Tipa
Health Tips: प्रग्नेंसीनंतर झपाट्याने वजन का वाढते?, एका क्लिकवर वाचा कारणं

भारतात चहा प्रेमींची संख्या अगणित आहे. जास्त पिल्या जाणाऱ्या पेयापैकी चहा हे पेय सर्वाधिक पिले जाते. भारतीयांमध्ये चहाबाबत एक वेगळेच प्रेम आहे. एवढे काय तर भारतीयांच्या दिवसाची सुरुवात सुद्धा गरमा-गरम चहासोबत होते. चहाचा एक घोट अनेकांचे टेन्शन दूर करते. काही चहा प्रेमी चहासोबत वेगवेगळ्या पदार्थ(Food) खाणे पसंत करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे काही असे पदार्थ आहेत, जे चहा सोबत खाल्ले तर तुमच्या आरोग्यसाठी घातक ठरतात

तळलेले पदार्थ

काही चहाप्रेमींना चहा सोबत तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु हे पदार्थ तुमच्या शरिरासाठी हानिकारक आहेत. तुम्ही जर चहा सोबत तळलेले पदार्थ खाल्ले तर तुम्हाला पचनासंबंधीत समस्या निर्माण होऊ शकते.

साईट्रिक अॅसिड असलेली फळे -

जर तुम्ही चहासोबत साईट्रिक अॅसिड असलेली फळे (Fruits)खाल्ली तर ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. लिंबू, संत्री, मोसंबी, अननस हे फळे चहासोबत खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

लोहयुक्त फळे

चहासोबत लोहयुक्त फळे खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हाणीकारक ठरू शकतात. डाळिंब, हरव्या भाज्या जर चहा सोबत खाल्ल्या तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

दही आणि दह्यांचे पदार्थ

चहा एक गरम पेय आहे. आणि दही (curd)हे थंड पेय आहे. त्यामुळे चहासोबत दही खाल्ले तर ते तुमच्या पचन क्षमतेवर विपरीत परिमाण करू शकते. त्यामुळे चहासोबत दही खाणे टाळा.

हळद

भरपूर औषधी गुणांनी भरलेली हळद जर तुम्ही चहासोबत(Tea) खाल्ली तर तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे चहासोबत हळद खाणे टाळा

या वरील गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. (डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.)

Tea Tipa
Health Tips: तुम्हाला चांगलं आरोग्य जगायचं तर 'या' गोष्टी करा,नेहमी राहणार ठणठणीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com