Mobile Recharge: Google Pay वरुन रिचार्ज करताय? मोजावे लागतील अधिक पैसे, कारण काय?

Google Pay Charge Money For Mobile Recharge: जर तुम्ही गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण गुगल पे वरुन मोबाइल रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
Google Pay Mobile Recharge Feature
Google Pay Mobile Recharge FeatureGoogle Pay Mobile Recharge Feature - Saam Tv
Published On

Google Pay Charge Extra Money:

डिजियाटझेशनच्या युगात हल्ली ऑनलाइन ट्रांझेक्शन अधिक प्रमाणात केले जाते. अशातच सर्वाधिक वापरले जाणारे अॅप Google Pay. गुगल पे हे देशातील सर्वात लोकप्रिय UPI Payment अॅपपैकी एक आहे. भारतामध्ये या अॅपचा अधिक प्रमाणात वापर केला जातो.

हल्ली Google Pay, Phonepe, Paytm आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पैसे ट्रान्सफर करताना आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अशातच जर तुम्ही गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण गुगल पे वरुन मोबाइल रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Google Pay Mobile Recharge Feature
NPCI चा युजर्सना झटका! GPay, PhonePe आणि PayTM लवकरच होणार बंद, तुमचा UPI ID आहे का यात?

यापूर्वी गुगल पे (Google Pay) ववरुन रिचार्ज करताना कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु, आता अतिरिक्त शुल्क सुविधा म्हणून वसूल केले जाणार आहे. यामध्ये जीएसटीचाही (Gst) समावेश करण्यात आला आहे.

1. कोणत्या सिम कार्डला किती पैसे मोजावे लागतील?

मिळालेल्या रिपोर्टनुसार ७४९ रुपयांच्या रिचार्जवर ३ रुपये (Price) जास्तीचे द्यावे लागतील. परंतु, हे शुल्क सर्वच वापरकर्त्याकडून घेतले जाणार नाही. गुगल पे हे शुल्क टप्प्या टप्प्यांने लागू करणार आहे. लवकरच ही शुल्क सुविधा गुगल पे ग्राहकांसाठी लागू करेल. यामध्ये १०० रुपयांच्या रिचार्जवर कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. १०१ ते २०० रुपयांच्या रिचार्जवर १ रुपया तर २०१ ते ३०० च्या रिचार्ज २ रुपये आकारले जातील. ३०० पेक्षा जास्त रुपयांच्या रिचार्जवर ३ रुपये आकारले जातील.

Google Pay Mobile Recharge Feature
Yoga Tips For Mental Health : मानसिक त्रास देऊ शकतो इतर आजारांना आमंत्रण, 'ही' योगासने नियमित करा

2. कोणत्या युजर्सला शुल्क आकारले जाणार नाही?

अहवालानुसार गुगल पे मोबाइल रिचार्जवर अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. वीज बिल आणि इतर रिचार्ज फ्री असेल. यापूर्वी गुगल पे Paytm द्वारे शुल्क आकारत होते. परंतु, गुगल पे ने अद्यापह ही सुविधा सुरु केली नाही.

Google Pay Mobile Recharge Feature
Winter Health Tips: थंडीत हात का थरथरतात? हे आहे कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com