Yoga Tips For Mental Health : मानसिक त्रास देऊ शकतो इतर आजारांना आमंत्रण, 'ही' योगासने नियमित करा

Mental Health : शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. कोरोना काळानंतर लोकांमध्ये नकारात्मकता वाढलेली दिसते. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने शरीर आणि मन दोन्हीच्या आरोग्यासाठी फायदा होतो.
Yoga Tips For Mental Health
Yoga Tips For Mental HealthSaam Tv
Published On

Yoga Tips :

शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने शरीर आणि मन दोन्हीच्या आरोग्यासाठी फायदा होतो. योगा केल्याने शरीरात लवचिकता आणि सामर्थ्य तर वाढतेच, शिवाय एकाग्रता आणि आत्मविश्वासही वाढतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलिकडच्या वर्षांत मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर लोकांमध्ये नकारात्मकता वाढलेली दिसते. यामुळे लॉकडाऊन संपून दोन वर्षानंतरही लोकांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या (Problem) वाढलेल्या दिसतात.

Yoga Tips For Mental Health
Yoga Tips For Neck Fat : मानेची चरबी कमी करण्यासाठी रोज 5 मिनिटे ही 2 योगासने करा, 15 दिवसात दिसेल फरक

कोविडमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम (Effect) पाहता येत्या काही वर्षांत मानसिक आरोग्याशी संबंधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशा स्थितीत, योगासन करून मानसिक आरोग्य सुधारले जाऊ शकते. या योगासनांचा सराव एकाग्रता वाढवण्यासाठी, तणाव आणि चिंता यापासून आराम मिळण्यासाठी तसेच नैराश्याच्या समस्येवर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो.

प्राणायाम
प्राणायामSaam Tv

प्राणायाम

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्राणायामचा सराव विशेषतः फायदेशीर आहे. प्राणायाम केल्याने मेंदूमध्ये ऑक्सिजनचा संचार होतो आणि स्नायूंना आराम मिळतो. मूड सुधारण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

Yoga Tips For Mental Health
Yoga Tips For Beginners : योग अभ्यास सुरू करण्याआधी लक्षात घ्या हे 20 नियम, वाचा सविस्तर
उत्तनासन योग
उत्तनासन योगSaam Tv

उत्तनासन योग

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी उत्तानासन योगाचा नियमित सराव करावा. उत्तानासन योग ही एक प्रखर फॉरवर्ड स्ट्रेच पोझ आहे जी संपूर्ण पाठीच्या स्नायूंना काम करते. या योगामुळे शरीरात ताकद आणि लवचिकता येते, तसेच मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्त प्रवाह सुधारतो. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही उत्तानासन योगाचा सराव करू शकता.

Yoga Tips For Mental Health
Yoga For Insomnia : रात्री झोप लागत नाही? सतत अस्वस्थ वाटते? ही योगासने करुन पाहा, लागेल शांत झोप
भुजंगासन
भुजंगासनSaam Tv

भुजंगासन

भुजंगासन म्हणजेच कोब्रा पोझ. पाठीच्या समस्यांवर हे आसन फायदेशीर मानले जाते पण त्याचा सराव मेंदूला निरोगी ठेवण्यासही उपयुक्त आहे. हे योगासन मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी उत्कृष्ट ठरू शकते. शरीरातील रक्त प्रवाह वाढवण्यासाठी आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी भुजंगासनाचा नियमित सराव करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com