Yoga For Insomnia : रात्री झोप लागत नाही? सतत अस्वस्थ वाटते? ही योगासने करुन पाहा, लागेल शांत झोप

Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Yoga For Insomnia
Yoga For InsomniaSaam Tv
Published On

Yoga For Better Sleep :

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

शांत झोप न मिळाल्याने आपल्या अस्वस्थ वाटते. ज्यामुळे चिंता आणि तणाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. झोप न येण्याच्या समस्येला निद्रानाश म्हणतात. यापासून आराम मिळवण्यासाठी काही योगासने मदत करु शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बालासन

बालासन तुमच्या शरीराला आराम देते. ज्यामुळे चांगली झोप घेण्यास मदत करते. हे आसान करण्यासाठी गुडघ्यावर बसा आणि दोन्ही टाचांना चिकटवा. गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा. यानंतर दीर्घ श्वास घ्या तसेच हळूहळू श्वास सोडा. आपले शरीर पुढे वाकवा, आपले हात पसरवा.

Yoga For Insomnia
Yoga For Stress Management : वाढत्या तणावावर करता येईल योगासनाने मात, नियमित करा ही आसने

2. बटरफ्लाय पोझ

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी ही योगासने (Yoga) फायदेशीर ठरतील. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. ही योगासने गर्भवती महिलांसाठी फायदेशीर (Benefits) आहे. या आसनामुळे पचनसंस्थाही सुरळीत राहाते.

3. विपरिता करणी

पाठीचा कणा, पाय आणि मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते. हे आसन नियमितपणे केल्यास मेंदूला शांत करण्यास मदत करते. ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com