Yoga For Stress Management : वाढत्या तणावावर करता येईल योगासनाने मात, नियमित करा ही आसने

How To Control Stress : तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला योगासने मदत करतील.
Yoga For Stress Management
Yoga For Stress ManagementSaam Tv
Published On

Stress Management Tips :

बदलत्या जीवनशैलीचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. झोप न लागणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाइमुळे आपण तणावाला बळी पडत आहोत.

अति तणावामुळे आपल्याला अनेक आजार जडतात. त्यासाठी तणावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला योगासने मदत करतील. जर तुम्हालाही कामाच्या व्यापामुळे अधिक तणाव येत असेल तर ही योगासने नियमितपणे करा. त्यामुळे मानसिक आरोग्य सुरळीत राहिल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बालासन

बालासन ही विश्रांतीची मुद्रा समजली जाते. बालासनामुळे मांड्याची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच पाठदुखीपासूनही (Back Pain) आराम मिळतो. जर तुम्ही सतत चिंतेत असाल तर हे आसन तुम्हाला फायदेशीर (Benefits) ठरेल.

Yoga For Stress Management
Weight Loss Tips : Dear Beginners, वर्कआउट सुरु केल्यानंतर शरीरात होतात हे ४ बदल, टेन्शन घेऊ नका

कसे कराल?

  • गुडघे पोटात वाकवून टाचांवर बसा.

  • तुमची पाठ सरळ ठेवून पुढे वाका म्हणजेच तुमचे गुडघे छातीला स्पर्श करतील.

  • हात सरळ ठेवून दीर्घ श्वास घ्या. तसेच श्वासावर लक्ष केंद्रित करा.

2. उत्तानासन

उत्तानासनमुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच ओटीपोटी आणि मांड्याच्या स्नायूंसाठी हे आसन फायदेशीर आहे.

Yoga For Stress Management
Yoga Tips : चुकीच्या पद्धतीने योगा करत असाल तर होईल आरोग्यावर वाईट परिणाम, या 5 चुका टाळा

कसे कराल?

  • हे आसन करताना पाठीवर झोपून एक पाय ६० ते ९० अंशापर्यंत वर केला जातो.

  • श्वास घेताना हात वर करा आणि श्वास सोडताना हळूहळू पुढे वाका.

  • गुडघे सरळ ठेवून, आपल्या हातांच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

3. शवासन

शवासनाच्या मदतीने शरीरातील तणाव (Stress) दूर होतो. हे आसन करताना शरीराची कोणतीही हालचाल होत नाही. ज्यामध्ये शरीर प्रेतासारखे दिसते. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. मनाला विश्रांती मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com