Yoga Tips For Beginners : योग अभ्यास सुरू करण्याआधी लक्षात घ्या हे 20 नियम, वाचा सविस्तर

Beginners Yoga Tips : योगा केल्याने तुम्हाला केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक समस्यांवरही मात करता येते.
Yoga Tips For Beginners
Yoga Tips For BeginnersSaam Tv

Yoga Tips :

योगा केल्याने तुम्हाला केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक समस्यांवरही मात करता येते. योगगुरुंच्या मते, योगाचे सर्व फायदे (Benefits) तेव्हाच मिळू शकतात जेव्हा सर्व नियमांचे पालन करून योगासने केली जातात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योगाचा इतिहास

योगाचा (Yoga) सर्वात प्राचीन उल्लेख भारतातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथांपैकी एक असलेल्या ऋग्वेदात आढळतो. प्राचीन स्त्रोतांनुसार, योग हा शब्द संस्कृत युज या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ भेटणे किंवा जोडणे असा होतो. योगाचा जन्मही भारतात 5000 हजार वर्षांपूर्वी झाला होता आणि त्याच्या प्रभावीतेमुळे तो हळूहळू जगभर पसरला. आजकाल योगाची अनेक नवीन आसने आणि टेक्निक तयार झाली आहेत आणि पाश्चिमात्य देशांमध्ये त्याला योग म्हणून ओळखले जाते.

Yoga Tips For Beginners
Yoga For Insomnia : रात्री झोप लागत नाही? सतत अस्वस्थ वाटते? ही योगासने करुन पाहा, लागेल शांत झोप

योगाचे नियम

  • योगाभ्यास करण्यापूर्वी आपले शरीर, मन आणि परिसर स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

  • योगासन रिकाम्या पोटी करावे. जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही कोमट पाण्यात थोडे मध टाकून ते पिऊ शकता.

  • कोणतेही योगासन सुरू करण्यापूर्वी मूत्राशय आणि आतडे रिकामे असावेत. त्यामुळे अगोदरच लघवी करा आणि शौच करा.

  • योगासन सुरू करण्यापूर्वी प्रार्थना आणि उपासना करा, असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि योग करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यास मदत होते.

  • योगिक क्रिया सामान्य श्वासोच्छवासाने आणि पूर्ण सतर्कतेने आणि लक्ष देऊन कराव्यात. हालचाली हळू आणि आरामात सुरू करा.

  • झाल्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याशिवाय योगासने सुरू करू नका.

Yoga Tips For Beginners
Yoga For Stress Management : वाढत्या तणावावर करता येईल योगासनाने मात, नियमित करा ही आसने
  • योगापूर्वी किंवा नंतर कोणताही कठोर व्यायाम करू नका.

  • अति उष्णता, थंडी किंवा दमट काळात योगा करू नका कारण या हवामानात तुम्ही एकाग्र होऊ शकणार नाही.

  • आध्यात्मिक आणि मानसिक शांतीसाठी योग करणाऱ्यांनी योग ग्रंथातील सर्व नियमांचे पालन केल्याशिवाय योग करू नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com