तरुणांमध्ये वाढणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या आजाराला दूर कसे ठेवाल?

उच्च रक्तदाब हा साधारण असणाऱ्या रक्तदाबापेक्षा जास्त असणारा दाब होय.
Hypertension, Why high blood pressure increases in young people
Hypertension, Why high blood pressure increases in young peopleब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : उच्च रक्तदाब हा साधारण असणाऱ्या रक्तदाबापेक्षा जास्त असणारा दाब होय. अनियमित रक्तदाबाबद्दल निष्काळजीपणा केल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

हे देखील पहा -

उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. यातील बहुतेक लोकांना यांची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाही व रुग्णाला दम लागतो. एकेकाळी उच्च रक्तदाब हा वृध्दांचा आजार समजला जायचा परंतु, सध्या जगात बदलेल्या जीवनशैलीमुळे तो तरुण पिढीत वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाबला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी त्याची लक्षणे ओळखून वेळीच आपल्या दैनंदिन जीवनात बदल करणे गरजेचे आहे.

समस्या काय आहे ?

हृदय आपल्या शरीरातील रक्ताला प्रवाहित करते. स्वच्छ रक्त धमन्यांद्वारे शरीराच्या इतर भागात जाते आणि शरीराच्या इतर भागातून दूषित रक्त परत हृदयाकडे येते. या प्रक्रियेस ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब असे म्हणतात.

Hypertension, Why high blood pressure increases in young people
रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी हा भात ठरेल फायदेशीर !

यापासून दूर कसे राहाल ?

१. आपल्या दररोजच्या जीवनशैलीत व्यायाम व योगाचा समावेश करा. त्यासाठी दररोज तीस ते साठ मिनिटे व्यायाम करायला हवे. या वेळात आपण चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा इतरही व्यायाम करु शकता तसेच मेडिटेशनही करु शकतो. यामुळे आपल्या मनाला शांती मिळेल व तणावापासून दूर राहाल.

२. उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात बदल करायला हवा. आहारात आपण फळे व हिरव्या भाज्यांचा समावेश करा. आहारात कोथिंबीर, कोबी, नारळ, आले, मध व केळे यांचा अवश्य समावेश करा.

३. तणावाला (Stress) आपल्यापासून दूर ठेवा. चिडचिड कमी करा. तणाव कमी झाल्यास रक्तदाबही कमी होईल. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वसन, पेशींना आराम देणारा व्यायाम करायला हवा.

४. आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा. सकस आहार, वजन कमी (Weight loss) करणे आणि वेदनाशामक गोळ्यांचे सेवन करु नये. यासंबंधीत कोणताही त्रास जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com