Air Pollution: वाढत्या प्रदूषणाचा मानसिकतेवर परिणाम, जडू शकतात हे आजार

Air Pollution Effect : प्रदुषणाचा लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे लोकांमध्ये चिडचिड, राग, तणाव वाढताना दिसत आहे.
Air Pollution
Air PollutionSaam Tv
Published On

Air Pollution Effect On Mental Health:

देशात सध्या प्रदुषणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रदुषणाचा लोकांच्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होताना दिसत आहे. सर्दी, खोकला, वायरल फ्लू असे अनेक आजार होत आहे. परंतु याचसोबत प्रदुषणाचा लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे लोकांमध्ये चिडचिड, राग, तणाव वाढताना दिसत आहे. प्रदुषणामुळे डोकेदुखी, झोप न येणे, मानसिक थकवा अशा समस्या होतात.

एका रिपोर्टनुसार, प्रदुषित शहरांमध्ये लोकांना नैराश्य, मानसिक ताण यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहे. प्रदुषणाचा लोकांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे माणसांमध्ये राग, आक्रमकता वाढत आहे.

प्रदुषणामुळे होणारे नुकसान

प्रदुषणामुळे हवेतील हानिकारक पदार्थ, वायू मेंदूपर्यंत पोहचतात. त्यामुळे खूप समस्या होतात. विशेषतः जे लोक प्रदुषित भागात राहतात त्यांना अल्झायमर, स्मृतीभंश असे आजार होण्याचा धोका जास्त असतो. प्रदुषणामुळे मेंदूचे नुकसान होते. तसेच पेशींमध्ये प्रोब्लेम येतात. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते.

न्यूरोजेनेरेटिव्ह डिसॉर्डर

हवेतील लहान कण आपल्या शरीरात जातात आणि मेंदूपर्यंत पोहचतात. हे कण मेंदूच्या पेशींचे नुकसान करते. यावेळी हवेतील प्रदुषणात राहिलात तर विसरणे, राग येणे अशा समस्या होऊ शकतात. या परिस्थितीत लोकांची स्मरणशक्ती कमी होते. त्यांना अनेक गोष्टी आठवत नाही. याला न्यूरोजनरेटिव्ह डिसॉर्डर म्हणतात. असे आजार टाळण्यासाठी प्रदुषण कमी करायला हवे.

Air Pollution
Pneumonia Outbreak : कोरोनानंतर आणखी एक भयंकर गूढ आजार; चीनमधील रुग्णांमध्ये मुलांचीच संख्या जास्त, लक्षणे काय?

एकटेपणा जाणवतो

वाढत्या प्रदुषणामुळे घराबाहेर पडण्याचे अनेकांचे मन करत नाही. त्यामुळे लोक घरातच जास्त राहतात. त्यामुळे आधीसारखे मित्र मैत्रिणींना भेटणेदेखील कमी होते. त्यामुळे अनेकांना एकटे वाटते. याचा परिणाम लोक नैराश्य आणि निराशेचे बळी होतात. घरात राहिल्याने लोकांमध्ये चिडचिड वाढते. राग येतो. त्यामुळे भांडणेदेखील होतात.

Air Pollution
NPCI चा युजर्सना झटका! GPay, PhonePe आणि PayTM लवकरच होणार बंद, तुमचा UPI ID आहे का यात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com