NPCI चा युजर्सना झटका! GPay, PhonePe आणि PayTM लवकरच होणार बंद, तुमचा UPI ID आहे का यात?

UPI ID : जर तुम्ही देखील GPay, PhonePe आणि PayTM चा वापर करत असाल कर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकरच हे थर्ड पार्टी पेमेंट अॅप्स बंद होणार आहे.
NPCI
NPCI Saam Tv
Published On

NPCI Deactivate UPI ID :

जर तुम्ही देखील GPay, PhonePe आणि PayTM चा वापर करत असाल कर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लवकरच हे थर्ड पार्टी पेमेंट अॅप्स बंद होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सला एका वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नसलेल्या खात्यांसाठी UPI सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जर तुम्ही वर्षभरात एकदाही UPI वरुन कोणताही व्यवहार केला नसेल, तर तुमचे खाते बंद करण्यात येईल. ज्यावरुन तुम्ही कोणतेही ट्रांजेक्शन करु शकणार नाही. NPCI चा हा नियम ३१ डिसेंबरपासून लागू केला जाणार आहे. जे UPI ID अॅक्टिव्ह आहेत आणि नियमितपणे वापरले जातात त्यांनाच ट्रांजेक्शन करता येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NPCI म्हटले की, या कारवाईमुळे UPI ची सुरक्षितता वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. बरेचदा मोबाइल (Mobile) नंबर बदल्यामुळे आपण UPI ID अपडेट करायला विसरतात. याचे कारण असे की, हा नंबर दुसऱ्या कुणाला तरी देण्यात येतो. ज्यामुळे आपले UPI ID त्या व्यक्तीकडे अॅक्टिव्ह असते. त्यामुळे फसवणूकीच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यासाठी NPCI ने महत्त्वाचे पाऊल उचले आहे.

NPCI
Google Pay, Paytm, UPI च्या युजर्संना झटका! 31 डिसेंबरनंतर व्यवहार होणार ठप्प, NPCI ची मोठी घोषणा

तसेच तुमचे UPI ID बंद करण्याआधी संबंधित बँका (Bank) ईमेल किंवा मेसेज पाठवेल. तसेच या नवीन नियमांमुळे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे (Money) ट्रान्सफर होण्यापासून रोखता येईल. मागच्या वर्षभरात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. NPCI ने हे नियम १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात येतील असे म्हटले आहे. ज्यामुळे फ्रॉड कमी होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com