Pneumonia Outbreak : कोरोनानंतर आणखी एक भयंकर गूढ आजार; चीनमधील रुग्णांमध्ये मुलांचीच संख्या जास्त, लक्षणे काय?

China Mysterious Disease : कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जग बाहेर पडतो न पडतो तोच आणखी एक भयंकर आणि तितक्यात गूढ आजारानं चीनला वेढा घातला आहे. रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या ही मुलांची आहे.
Pneumonia Outbreak in China
Pneumonia Outbreak in ChinaSaam tv
Published On

China Pneumonia Outbreak:

कोरोनाच्या संकटातून आता कुठं अख्खं जग सावरलं असताना पुन्हा चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. गूढ आजारानं चीनला विळखा घातला आहे. चीनमधील शाळांमधील मुलांना या आजारानं ग्रासलं आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनानं शाळा देखील बंद केल्या आहेत. रुग्णांमध्ये मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा आजार न्यूमोनियाचा असून मुलांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, येथील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चीनमध्ये सध्या परिस्थिती ही पुन्हा एकदा कोरोनासारखी होत आहे. या आजारात लहान मुलांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. वाढत्या रुग्णांमुळे तेथील प्रशासन देखील चिंतेत आहे. या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडून माहिती देखील मागवल्याचे वृत्त समोर आले आहे.

Pneumonia Outbreak in China
Malvani Bangda Fry : चव विसणारच नाही, ट्राय करा चमचमीत मालवणी बांगडा फ्राय; पाहा रेसिपी

लक्षणे (Symptoms) काय?

या आजारात लहान मुलांच्या (Child) फुफ्फुसात सूज येणे आणि ताप येण्यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच खोकला, फ्लू, आरएसव्ही आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे अद्याप मिळालेली नाही.

डिसेंबर २०१९ मध्ये आयएसआयने आजाराबाबत अलर्ट जारी केला होता, त्यानंतर कोरोनाच्या महामारीने जगभरात थैमान घातले होते. जगभरात मानवी आणि प्राण्यांच्या आजारांच्या उद्रेकावर लक्ष ठेवणाऱ्या ओपन अॅक्सेस सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म प्रोमेडने चीनमध्ये पसरणाऱ्या या गूढ न्यूमोनियाबाबत इशारा दिला आहे.

चायना डेली मधील एका अहवालात म्हटले की, चीनमध्ये सध्या श्वसनाच्या विकांराचा आजार सुरु झाला आहे. यांच्या संपर्कात अनेक लोक आल्याने अनेक जण आजारी पडत आहे. त्यामुळे शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com