कोमल दामुद्रे
मासे म्हटले की, अनेक नॉन व्हेज प्रेमींच्या जीभेला पाणी सुटते.
नॉन व्हेज शौकिन असाल तर तुम्ही मालवणी बांगडा फ्राय रेसिपी ट्राय करु शकता.
बांगडे स्वच्छ धूऊन साफ केलेले,1/2 कप कोथिंबीर,आलं,लसूण,मिरची पेस्ट, 1 टेबलस्पून मालवणी मसाला, 1/2 टिस्पून हळद, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर, 1/4 कप तांदळाचं पीठ, 1/2 कप रवा, कोकम आगळ, तेल
बांगडे स्वच्छ करून त्याला कोकम आगळ मीठ लावून १५ मिनिटे ठेवा.
ताटात कोथिंबीर, आले-लसूण-मिरची पेस्ट, मालवणी मसाला, हळद, काश्मिरी मिरची पावडर घालून छान मिक्स करा. हा मसाला बांगड्याना व्यवस्थित लावून घ्या.
तांदळाचं पीठ आणि थोडा रवा,लाल तिखट,मीठ घालून छान मिक्स करा.
तयार मिश्रणात घोळवून घ्या. तव्यावर तेल गरम करुन छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी फ्राय करा.
तयार आहे चमचमीत मालवणी बांगडा फ्राय.