

पावसाळ्यात फक्त त्वचा, डोळे किंवा सांधेच नाही तर जठरासंबंधी समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत काळजी घेणे आणि जठरासंबंधी समस्या दूर ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात आतड्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
आर्द्रता, दूषित पाणी आणि अन्न हे गॅस्ट्रिक समस्यांना कारणीभूत ठरणा-या घटकांमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगणे, जठरासंबंधी समस्या जाणवणे, आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी अशा समस्या होतात. शिळे किंवा खराब झालेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते.
याबाबतची माहिती दिली आहे मुंबईतील परेल ग्लोबल हॉस्पिटल्सचे संचालक आणि पोटविकार तज्ज्ञ डॉ मेघराज इंगळे यांनी दिली आहे. ते म्हणतात साल्मोनेला आणि ई कोलाईसारख्या जीवाणूंनी संक्रमित असे कच्चे आणि कमी शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा होते.
दूषित पाणी (Water) वापरल्याने अतिसार आणि पोटाच्या संसर्गास आमंत्रण मिळते. गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा पोटाचा फ्लू ही देखील आणखी एक समस्या आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, पोट आणि आतड्यांची जळजळ होते. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित लोकांच्या संपर्कात येते किंवा दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करते तेव्हा त्या व्यक्तींस संसर्गाचा धोका असतो. जुलाब, उलट्या, पोटदुखी (Stomach Pain), वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी ही त्याची लक्षणे आहेत.
गॅस्ट्रिक समस्या टाळण्यासाठी पावसाळ्यात या टिप्स फॉलो करा
1. प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा:
आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स उपयुक्त ठरतात. दही (Curd), ताक यांचा आहारात समावेश करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
2. पुरेसे पाणी प्या:
पचनास मदत करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दररोज किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे लक्षात ठेवा की, शरीर ओव्हरहायड्रेट करु नका कारण ते देखील आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.
3. कच्च्या भाज्या खाऊ नका:
वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्यांचा खाणे पचनासाठी योग्य ठरते. कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असू शकतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
4. न शिजविलेले सीफूड खाणे टाळा :
पावसाळ्यात पाणी दूषित असल्याने सुशी, साशिमी सारखे कच्चे सीफूड खाल्ल्याने अतिसाराची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि हवाबंद डब्यातील अन्नाचे सेवन करणे टाळा.
5. शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा:
आईस्क्रीम, चॉकलेट, कँडी, मिठाईचे सेवन कमी करा त्यामुळे शरीरातील जळजळ होऊ शकते आणि आतड्याला त्रास होऊ शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.